Vasco Ram Navami : वास्कोत फ्रान्सिसचे गीत रामायण रंगले; भाविकांची गर्दी

Vasco Ram Navami : मंदिरात सकाळपासून पुरोहितांच्या पौरोहित्याखाली विविध धार्मिक विधी पार पडल्या. नंतर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
Vasco Ram Navami
Vasco Ram Navami Dainik Gomantak

Vasco Ram Navami :

वास्को, रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री राम दर्शनासाठी भक्तांचा महासागर लोटला.

रामनवमीनिमित्त श्री राम मंदिर तसेच श्री हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. फ्रान्सिस ॲंन्थोनी यांचा गीत रामायणाचा कार्यक्रम रंगला. त्यांनी विविध गीते सादर केली.

पहाटेपासून श्रीराम नाम जपाने मंदिर परिसर गजबजून गेला. मेस्तवाडा, वरुणापुरी येथील श्री राम मंदिरात सकाळपासून भक्तांचा महासागर लोटला होता. मंदिरात सकाळपासून पुरोहितांच्या पौरोहित्याखाली विविध धार्मिक विधी पार पडल्या. नंतर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

Vasco Ram Navami
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

दुपारी १२ वाजता श्रीरामांचे पाळणा गीत गाऊन श्री रामजन्म सोहळा भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला. तसेच नवेवाडे, बायणा, मांगूरहील, हेडलैंड सडा, जेटी, जुवारीनगर, कोन्सूआ येथील श्री हनुमान मंदिरातही रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी काही मंदिरात भजन, तसेच काही ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

मेस्तवाडा येथे श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. श्री राम नवमी उत्सवानिमित्त मंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी झाल्या. भजन, कीर्तन व दुपारी श्री रामजन्म पाळणा, आरती व तिर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. गायक ॲंन्थोनी यांनी कार्यक्रमाची सुरुवात तू सुखकर्ता तू दुखहर्ता या गणपती स्तवनाने केली.

Vasco Ram Navami
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

माडगुळकर यांच्या गीत रामायणातील निवडक गाणी सादर केली. स्वये श्री रामप्रभू ऐकती, शरयू तीरावरी अयोध्या, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखी, स्वयंवर झाले सितेचे, दैवजात दुखे भरता, उदास कातू, नकोस नौके, सेतू बांधारे, लोक साक्ष शुद्धी झाली व रघुरामाच्या नगरी जाऊनी ही भैरवी सादर करून भाविकांना रिझवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com