Drishti Marine lifeguard: पोर्तुगालचा 'वास्को' गोव्यात जीवरक्षक, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना देतोय जीवदान

Drishti Marine lifeguard Vasco Preto: वास्को प्रेटो (२३) हा पोर्तुगालमधील पोर्टो शहरातील युवक सध्या गोव्यातील ''दृष्टी मरिन'' या आघाडीच्या लाइफ सेव्हिंग या खासगी कंपनीसाठी जीवरक्षक म्हणून सेवा देत आहे.
Drishti Marine lifeguard
Drishti Marine lifeguardDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वास्को प्रेटो (२३) हा पोर्तुगालमधील पोर्टो शहरातील युवक सध्या गोव्यातील ''दृष्टी मरिन'' या आघाडीच्या लाइफ सेव्हिंग या खासगी कंपनीसाठी जीवरक्षक म्हणून सेवा देत आहे. गेल्या सहा वर्षांपासून पोर्तुगाल आणि कोस्टा रिका येथे समुद्रकिनाऱ्यावर कामाचा अनुभव घेतल्यानंतर तो गोव्यात आला आहे.

पाण्यावरील सुरक्षिततेसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या या युवकाचा अनुभव आणि समर्पण हे जीवरक्षकांसाठी एक आदर्श ठरत आहे.

वास्को यांनी सांगितले की, गोव्यात येणे माझ्यासाठी एक स्वप्नासारखे होते. पोर्तुगाल आणि गोव्याचा ऐतिहासिक संबंध मला आकर्षित करत होता. दृष्टी मरिनच्या मदतीमुळे गोव्यात येणे शक्य झाले. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी खूपच सहकार्य केले आणि सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे तो म्हणाला.

Drishti Marine lifeguard
Goa Crime: परदेशात नोकरी करायचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं, मडगावात रेल्वे रूळावर आढळला युवकाचा मृतदेह

येथील समुद्र शांत आहेत, पण येथे बऱ्याच लोकांना पोहणे येत नाही. त्यामुळे सतत सावध राहावे लागेते, असे वास्को यांनी सांगितले.

Drishti Marine lifeguard
Goa Murder Case: श्रवणचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट; खूनाचा कट कुणी रचला?

भारत विविधतेने नटलेली भूमी

पोर्टोमध्ये लहानपणी शिकलेल्या इतिहासाच्या धड्यांमध्ये वास्को द गामा यांचा भारतप्रवास नेहमीच मनावर ठसलेला होता. वास्को द गामा आणि मी नावाने समान आहोत, त्यामुळे त्यांचा भारत प्रवास मला अधिकच भावला. पण इथे आल्यावर लक्षात आले की भारत ही एक अत्यंत विविधतेने नटलेली आणि समृद्ध संस्कृतीची भूमी आहे, असे वास्को यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com