Vasco Police News: सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक; 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वास्को पोलिसांची कारवाई, मुरगाव पोलिसांकडे सोपविणार ताबा
Vasco Police News:
Vasco Police News:Dainik Gomantak
Published on
Updated on

Vasco Police News: वास्को येथील सडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्टोअररूममधून मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी वास्को पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून सुमारे 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वास्को पोलिसांत याबाबत गुन्हा नोंद झाला होता. हा माल या तिघांनीही बाहेर विकण्याचा प्रयत्न केला होता.

नागू गोलाय (50 वय), ओनबा राठोड (40 वय), अपर्णा राठोड (40 वय) या तिघांना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्यांकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालाची खात्री करून घेतली. त्यांनी यापुर्वीच मुरगावमध्ये चोरीची तक्रार नोंदवली होती.

मुरगाव पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. आता या संशयितांना पुढील चौकशीसाठी मुरगाव पोलिसांकडे सोपविले जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Thivim Theft
Goa State Pollution Control Board report
Sand Shortage Goa
Pernem Crematorium Issue
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com