Drugs Seized in Vasco
Drugs Seized in VascoDainik Gomantak

Drugs Seized in Vasco: वास्को पोलिसांची वरुणापुरीत धाड; एक लाखाहून जास्त किमतीचा गांजा तस्करीप्रकरणी एकाला अटक

अक्षय कुमार शेट्टी (मुरगाव) याला 1.2 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे
Published on

Drugs Seized in Vasco: वाढत्या ड्रग्ज घटनांमुळे राज्याभोवती ड्रग्ज तस्करांचा विळखा वाढत चालला आहे.

यासाठी गोवा पोलीस सतर्क असून सापळे रचत ते अशा ड्रग्ज पेडलरना ताब्यात घेत आहेत. वास्को पोलिसांनी आज याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

Drugs Seized in Vasco
Goa Assembly Monsoon Session 2023: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणावर कोण, काय बोलले?

वास्को पोलिसांनी वरुणापुरी येथे अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी सापळा रचत एकाला अटक केली आहे.

अक्षय कुमार शेट्टी (मुरगाव) याला 1,20,000 रुपये किमतीचा 1.2 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

तो हे ड्रग्ज कुणाला पुरवणार होता किंवा तो कोणत्या टोळीचा भाग आहे याबाबत पोलीस अधिक तपास करात आहेत.

परवा अशीच घटना समोर आली होती. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) परदेशातून गोव्यात आणले जाणारे ३६ कोटी रुपयांचे ५.२ किलो हेरॉईन दिल्लीत जप्त केले आहे.

या तस्करीप्रकरणी गोव्यातून एक महिलेला आणि दिल्लीत दोघांना अशा तिघांना अटक केली आहे.

मूळ हैद्राबाद येथील महिला शैलजा सिरामशेट्टी (वय ४२) हिला डीआरआय अधिकाऱ्यांनी कळंगुट येथे अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com