
वास्को: शहरातील साळगावकर ऑफिससमोरच्या रस्त्यावर अतिक्रमण करणारे फळविक्रेते आणि इतरांना पालिका कधी हटविणार, असा सवाल वास्कोवासीय विचारत आहेत.
याच रस्त्याकडेला उभे केलेले दोन मोठे टिप्पर ट्रक हटविले होते. आता या रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याबद्दल वास्कोवासीय आश्र्चर्य व्यक्त करीत आहेत.
या रस्त्याच्या कडेला दोन मोठे टिप्पर ट्रक काही महिने उभे होते. त्याबद्दल येथे उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्या टिप्पर मालकाने ट्रक तेथून हटविले. त्यामुळे त्या जागेत दुचाकी वाहने उभी करण्याची सोय झाली आहे;
परंतु त्या पुढील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना अद्याप हटविलेले नाही. त्यातच येथील विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या विक्रेत्यांपैकी काहीजणांनी आपली जुनी वाहने तेथे उभी केली आहेत.
रात्रीच्यावेळी आपला माल त्या जुन्या वाहनांमध्ये ठेवून विक्रेते जातात. त्यांनी मोठमोठ्या छत्र्या उभारल्या आहेत. या विक्रेत्यांना तेथून हटविण्यासाठी मुरगाव पालिका काहीच करीत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या प्रश्नाची दखल घेऊन मुरगाव पालिका कारवाई करणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्किंगसाठी जागा ठेवली होती. यापूर्वी तेथे अतिक्रमण करून भाजी, फळ, नारळ वगैरे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना हटवून मासळी मार्केटमध्ये जागा दिली होती. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंगची जागा मिळाल्याने ते समाधानी होती; परंतु थोड्याच दिवसांत या विक्रेत्यांनी पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण केले. त्यामुळे वाहनचालक भर रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते.
एफ. एम. गोम्स या मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर विक्रेत्यांचे नेहमीच अतिक्रमण असते. या ठिकाणी तात्पुरते मासळी मार्केट उभारले आहे. या मार्केटबाहेर बसण्यासाठी विक्रेत्यांना जागा करून दिली होती. आता त्या जागेचा वापर करता करता विक्रेत्यांनी रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे. त्यांच्याविरोधातही कोणतीही कारवाई होत नाही. प्रशासनाने यात लक्ष घालावे. अशी मागणी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.