Vasco-Nizamuddin Express: उत्तर भारतातील घनदाट धुक्यामुळे 'वास्को - निजामुद्दीन'सह 23 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले
Vasco-Nizamuddin Express
Vasco-Nizamuddin ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco-Nizamuddin Express: राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि घनदाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले.

गोव्यात येणाऱ्या वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेस वरही त्याचा परीणाम झालेला असून सध्या ही गाडी दोन तास उशिरा धावत असल्याचे भारतीय रेल्वेने कळविले आहे.

Vasco-Nizamuddin Express
Goa News Updates 12 January 2024: सिकेरी हत्या प्रकरण, अपघात, वीज बिल घोटाळा प्रकरण तसेच राज्यातील अन्य घटनांचा आढावा

कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर भारतात नागरिकांचे हाल होत आहेत. तापमानात आणखी घसरण होऊ शकते. सध्या दाट धुक्यापासून दिलासा मिळण्याची आशा नाही. यामुळे दृश्यमानताही लक्षणीयरीत्या कमी झाली असून त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रेल्वेतर्फे जारी केलेल्या यादीनुसार घनदाट धुक्यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या 'वास्को-निजामुद्दीन'सह 23 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

यामुळे आज १२ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्लीहून गोव्यात येणारी 'गोवा-निझामुद्दीन' - १२७७९ ही गाडी उशिरा पोहचू शकते. रेल्वेने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार वास्को-निजामुद्दीन-१२७७९ दोन तास उशिराने धावत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com