Vasco: मांगोरहील ओव्हरब्रिजची डोकेदुखी संपणार? लवकरच काम सुरु; आमदार साळकरांनी घेतला आढावा

Vasco Railway Over Bridge: वास्कोहून मांगोरहीलच्या दिशेने जाताना तानिया हॉटेलसमोर असलेला रेल्वे ओव्हर ब्रीज हा अवजड वाहनांसाठी डोकेदुखी बनला आहे.
Vasco Railway Over Bridge
Krishna Salkar VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत तानिया हाॅटेल समोर होऊ घातलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या जागेची संयुक्त पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

वास्कोहून मांगोरहीलच्या दिशेने जाताना तानिया हॉटेलसमोर असलेला रेल्वे ओव्हर ब्रीज हा अवजड वाहनांसाठी डोकेदुखी बनला आहे, कारण या ओव्हर ब्रीजची उंची कमी असल्याने याच्या खालून अवजड वाहने जाऊ शकत नाही. तसेच आपात्कालीन वेळी फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही. त्यामुळे या ओवर ब्रीजची उंची वाढवणे गरजेचे होते. तसेच याठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्याने याचा त्रास वाहन चालक व पादचाऱ्यांनाही होत असे. त्यानुसार यावर उपाय योजना आखण्यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी रेल्वेशी बोलणी करून रेल्वे ओव्हर ब्रीजची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मांडला व त्यानुसार या ओव्हर ब्रीजचे काम लवकरच सुरू होणार आहे.

Vasco Railway Over Bridge
Porvorim Flyover: 88 पैकी 40 खांबांचे काम पूर्ण! पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर

दरम्यान याकामाविषयी आमदार साळकर यांनी आज रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस वाहतूक पोलिस उपजिल्हाधिकारी, मामलेदार, अग्निशमन दल शासकीय अधिका-यांसमवेत संयुक्त पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या त्रूटीविषयी प्रश्न उपस्थित झाला असता त्यांनी यावर उपाययोजना आखण्याविषयी सविस्तर चर्चा करून पाण्याचा मार्ग व्यवथित करण्याच्या सूचना दिल्या. कोंडी टाळण्याची सूचनाही वाहतूक पोलिसांना केली.

Vasco Railway Over Bridge
Vasco: मुरगाव पालिकेची धडक कारवाई! अवैध विक्री करणाऱ्यांची मासळी जप्त; वास्को-खारीवाड्यातील प्रकार

‘ओव्हरब्रिज’ची उंची वाढवणे गरजेचे!

यावेळी बोलताना साळकर यांनी कमी उंची असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजची उंची वाढवणे कृमप्राप्त आहे. त्यामुळे मांगोरहील, बेलाबाय, मेस्तवाडा याठीकाणी जाणाऱ्या वाहन चालकांना तसेच लोकांना सोयीस्कर होईल. मुख्य म्हणजे आपत्कालीन वेळी अग्निशमन दलाला या ब्रीज खालून जाणे तितकेच सोयीस्कर होईल. या ओव्हर ब्रीजमुळे लोकांची मोठी समस्या सुटेल, असे आमदार साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com