दाबोळी: वास्कोचे (Vasco) आमदार कार्लोस आल्मेदा यांनी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्यावर केला घोटाळ्याचा आरोप पालिकेचे पुरानत्व नष्ट करुन घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. मुरगाव नगरपालिका ही चारशे पन्नास वर्षांपूर्वीचे पुरातत्त्व इमारत असून त्याचे प्राणतत्त्व टिकून ठेवणे गरजेचे आहे दुरुस्तीच्या नावाखाली उगाच तिच पुरावे नष्ट करणे बरोबर नाही
पोरांना टिकवून ठेवणे म्हणजे इमारतीचा साचा तसाच ठेवून त्याची डागडुजी करणे क्रमप्राप्त आहे इमारतीचे परत वस्तू नष्ट करून त्यावर पत्रे चढवले म्हणजे ती यात मोठा घोटाळा असून याविषयी चौकशी होणे गरजेचे आहे या घोटाळ्यात मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांचा हात नाही गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे काम चालू असून यात नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली सदर काम चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या नेतृत्वाखालील जीसुडा द्वारे पालिका इमारतीच्या नूतनीकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला आणि अधिकाऱ्यांना घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.त्यावर मिलिंद नाईक यांनी आपली प्रतिक्रिया देतांना, "भाजप आमदार स्वतःच्याच सरकारवर आरोप करत आहेत हे आतिशय लज्जास्पद आहे. आल्मेदा यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पात काही विसंगती दिसल्यास त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कळवायला हवे होते. मात्र गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळ फक्त सरकारी प्रकल्पांसाठी काम करते. हे त्यांनी लक्षात घ्यावे,"असे वक्तव्य नाईक यांनी केले.या कामात जर मिलिंद नाईक यांनी घोटाळा केला असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार दाखल करावी.तसेच त्यांनी मला याकामाविषयी काय कमतरता आहे हेकळविणे भाग होते.पण त्यांनी माझ्याकडे एकदाही तशी बोलणी केली नसल्याचे मंत्री नाईक म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.