

वास्को: केरळमधील एक कुटुंब बाहेरगावी गेले असताना, झुआरीनगर-वास्कोमधील एका हॉटेलच्या कुलूप लावलेल्या खोलीतून अंदाजे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कथितरित्या चोरीला गेले. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
केरळमधील कोल्लम येथील रहिवासी फातिमा शाह यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सुट्टीदरम्यान हॉटेलची खोली बुक केली होती. १६ एप्रिल रोजी, सायं. ७.१५ ते रात्री ११.३० वा.च्या दरम्यान कुटुंबातील सदस्य खोलीबाहेर होते.
त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन, अज्ञात व्यक्तींनी कथितरित्या कुलूप लावलेल्या खोलीत प्रवेश करून सुमारे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिना चोरले. हा दागिना खोलीतील एका पिशवीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
वेर्णा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरीप्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत पुढील तपास सुरू आहे. पीआय आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीत आणि मुरगाव येथील उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश भोमकर यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.