Vasco Fish Market : वास्को मासळी मार्केट खुले होणार : कृष्णा साळकर

Vasco Fish Market : दीड वर्षांत प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण
Vasco Fish Market
Vasco Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को, नवीन मासळी मार्केटचा प्रलंबित प्रकल्प ऑगस्टअखेर तयार होईल आणि त्यानंतर लगेचच उद्‍घाटन करण्यात येणार आहे, असे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. २५ वर्षांहून अधिक हा प्रकल्प रखडलेला होता.

वास्कोत बांधण्यात येत असलेल्या नवीन मासळी मार्केटचे काम पूर्णत्वाकडे पोचले असून ३१ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करून उद्‍घाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुसज्ज सोयी सुविधांनी परिपूर्ण असा नवीन मासळी मार्केट प्रकल्प असणार आहे.

प्रकल्प बांधण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर दीड वर्षात प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर पोचला असून त्यासाठी मुख्यमंत्री सावंत आणि नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी पूर्ण सहकार्य केल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

वास्कोत बांधण्यात येत असलेल्या या नवीन मासळी मार्केट प्रकल्पाचे ९० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. आमदार साळकर यांनी या कामाची पाहणी केली. साळकर यांनी मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष गिरीश बोरकर, प्रभाग नगरसेवक शमी साळकर, सुदेश भोसले आदींच्या उपस्थितीत जीसूडाच्या अधिकाऱ्यांसमवेत वास्को येथील नवीन मासळी मार्केटच्या कामाची संयुक्त पाहणी केली.

हा प्रकल्प ऑगस्ट अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आम्ही हा प्रकल्प वास्कोच्या मासळी बाजार विक्रेत्यांच्या गरजेनुसार बनवला आहे आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत होणार आहे. विक्रेत्यांकडे त्यांची मासे साठवण्यासाठी आणि विकण्यासाठी पुरेशी जागा असेल, साळकर यांनी सांगितले.

Vasco Fish Market
Goa New DGP Alok Kumar: कोण आहेत गोव्याचे नवे पोलिस महासंचालक अलोक कुमार?

आवश्‍यक सुविधा!

प्रत्येक काउंटरवर पाण्याचा निचरा होण्यासाठी आउटलेट असलेली पाइपलाइन आहे. पहिल्या मजल्यावर फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांना व्यवसाय करण्यासाठी पुरेशी जागा असेल आणि त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी एक मोठा हॉल आहे, जेणेकरून ते कोणत्याही गोंधळाशिवाय मोठ्या मोकळ्या जागेत त्यांची प्रार्थना सभा आणि इतर धार्मिक कार्ये करू शकतील, अशा प्रकारे सुसज्ज प्रकल्प बांधण्यात आला आहे, असे साळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com