कोलकातानंतर पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात (Train Accident) टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी सकाळी 8.56 वाजता वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्सप्रेस (Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express) रुळावरून घसरली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, गोव्यातील दूधसागर आणि करंजोलजवळ रेल्वेच्या लोकोची पुढची चाके रुळावरून घसरली, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express Latest News updates)
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सर्व प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी सुरक्षित आहेत. ट्रेन रुळावरून घसरल्याने संपूर्ण ट्रॅक बंद असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक एआरटी ट्रेन (Accident Relief Train) दूधसागरकडे रवाना करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून सध्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
एका अधिकृत निवेदनात, दक्षिण पश्चिम रेल्वेने सांगितले की, ट्रेन वास्को द गामा येथून सकाळी 6.30 वाजता निघाली आणि सकाळी 8.50 वाजता दूधसागर पार केली व करंनझोल येथे ट्रेनच्या पुढच्या लोकोची पुढची जोडी रुळावरून घसरली.सदर घटनेविषयी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच एआरटी आणि वैद्यकीय उपकरणे व्हॅन कॅसल रॉक येथून सकाळी 9.45 वाजता निघाली आणि सकाळी 10.35 वाजता घटनास्थळी पोहोचली व काम युद्ध पातळीवर सुरू केले. डीआरएम हुबळी, अरविंद मालखेडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय पथकासह सेल्फ प्रोपेल्ड एआरटीने घटनास्थळी दाखल झाले.दुपारी 11.30 च्या दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.त्यामुळे इतर रेल्वे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्याची पाळी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर आली नसल्याचे वास्को रेल्वे स्टेशन मॅनेजर रामदास गुडेमनी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.