

वास्को: वास्को शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी चोरी आणि प्राणघातक हल्ल्याचे दोन गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वास्को पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू केलाय.
वास्को येथील कॅनरा बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूने असलेल्या शौचालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केला. आत शिरल्यानंतर त्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील कापले आणि थेट लॉकर रूम गाठली.
चोरट्यांनी लॉकर रूमचा दरवाजा कापण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. शाखा व्यवस्थापक मोहन कुमार सैकिया यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पोलीस सब-इन्स्पेक्टर (LPSI) प्रियांका पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसरी घटना मांगूर हिल येथील कोस्ट गार्ड गेटजवळ मध्यरात्री घडली. तक्रारदार आणि त्यांचे काका रस्त्याने जात असताना अज्ञात संशयितांनी त्यांच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर संशयितांनी गाडीतून उतरून हॉकी स्टिकने दोघांनाही बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर संशयितांनी त्यांच्याकडील ५,००० रुपये रोख लुटून पळ काढला.वास्को पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०५/२०२६ नोंदवला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. वास्को पोलिसांनी दोन्ही घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.