Ponda Varkhande: फोंड्यातील हनुमान तीर्थ तळीचे होणार जतन! कृषिमंत्री नाईक यांचे प्रयत्न, 'जलस्रोत'तर्फे 47 लाखांचा निधी

Ponda Varkhande Hanuman Lake: तळीची स्वच्छता, गणपती विसर्जनासाठी एका बाजूला सोय, तळीच्या परिसराचे सौंदर्यीकरण तसेच इतर कामांचा समावेश आहे.
Ravi Naik, Ponda Varkhande Hanuman Lake
Ravi Naik, Ponda Varkhande Hanuman LakeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यातील जुन्या पुराण्या ज्या जलस्रोतावर एक काळ पिण्याच्या पाण्याची तहान भागत असे, ज्या पाण्यावर शेती-बागायती केली जायची त्या वारखंडे-फोंडा येथील हनुमान तीर्थ तळीच्या जतन आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला मंगळवारी (ता.१) प्रारंभ झाला. फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी फोंडा नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रूपक देसाई, कुर्टी - खांडेपार पंचसदस्य मनीष नाईक, हरेश नाईक, साजिदा सय्यद, निर्मल विश्‍वचे प्रदीप कामत, समाजकार्यकर्ते प्रमोद सावंत, गुलाब बोरकर, अनिल कोरडे, जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंते शैलेश नाईक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Ravi Naik, Ponda Varkhande Hanuman Lake
Ponda Shishirotsav: फोंड्यातील शिशिरोत्सव! नवरदेवाच्या मिरवणुका, शौर्य आणि क्रौर्याचा मिलाफ वीरभद्र

जलस्त्रोत खात्यातर्फे सुमारे ४७ लाख रुपये खर्चून हे काम केले जाणार आहे. त्यात तळीची स्वच्छता, गणपती विसर्जनासाठी एका बाजूला सोय, तळीच्या परिसराचे सौंदर्यीकरण तसेच इतर कामांचा समावेश आहे.

Ravi Naik, Ponda Varkhande Hanuman Lake
Ponda: फोंडा पालिकेचे अंदाजपत्रक सादर! 'सोपो' गोळा करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ; 36 कोटी उत्पन्न

या तळीच्या बाजूलाच चौपदरी रस्ता उभारण्यात आला आहे, तरीही हा परिसर शांत आणि रमणीय असा आहे. आता सरकारकडून या परिसराचे सुशोभीकरण, तळीच्या संवर्धनाचे काम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com