Quepem News : अनेक प्रकल्‍प रखडले; कोणी वालीच नाही!

केपे पालिकेचा मार्केट प्रकल्‍प तयार झाला असला तरी ‘सुडा’ने अजून या प्रकल्‍पाचा ताबा पालिकेला न दिल्‍याने अजून तो विनावापर पडून आहे.
partially project
partially projectDainik Gomantak
Published on
Updated on

Quepem News : केपे राज्यातील लहान तालुक्यांमध्‍ये केपे तालुक्याचा समावेश होतो. या तालुक्यात दोन मतदारसंघ येतात केपे व कुडचडे. पण विकासकामांच्या दृष्टीने हा मतदारसंघ बराच मागे आहे. तसेच गेल्या दीड वर्षापासून या मतदारसंघाला ग्रहण लागले असून चालीस लागलेले बरेच प्रकल्प बंद पडले आहेत.

यातील काही पूर्ण झालेले प्रकल्प अद्याप सुरू केले नसल्याने लोकांमध्ये नाराजी व्‍यक्त करण्‍यात येत आहे.बाबू कवळेकर आमदार असताना केपे मतदारसंघात बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्प,

पालिका इमारत, वाचनालय, नवीन मार्केट प्रकल्पाची उभारणी, पोलिस स्थानकाची भव्य इमारत असे प्रकल्प मार्गी लागले होते. मात्र पोलिस स्‍थानकाची इमारत प्रकल्‍प मागची कित्‍येक वर्षे तसाच अर्धवट

स्‍थितीत पडून आहे. केपे पालिकेचा मार्केट प्रकल्‍प तयार झाला असला तरी ‘सुडा’ने अजून या प्रकल्‍पाचा ताबा पालिकेला न दिल्‍याने अजून तो विनावापर पडून आहे.

केपे पोलिस स्थानकाची पोर्तुगीजकालीन वास्तू पाडून त्याजागी भव्य अशी नवीन इमारत उभारण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासूम संथगतीने सुरू आहे. नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या पोलिस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून तेथे पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ज्याप्रमाणे सध्‍या या पोलिस स्थानकाचे काम सुरू आहे ते पाहता आणखी पाच वर्षांतही ते पूर्ण होणार नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

केपे पालिकेच्या मार्केट प्रकल्पाची भव्य इमारत बांधून गेल्या दोन वर्षांपूर्वी उद्‌घाटन झाले. पण अद्याप या इमारतीत स्थलांतरित दुकानमालकांना जागा देण्यात आलेली नाही किंवा बाकी दुकाने देण्यासाठी कोणतीच पावले उचललेली नाहीत. त्‍यामुळे पालिकेला नुकसान सोसावे लागत आहे.

बाजारात होतोय वाहतुकीचा खोळंबा

केपे बाजारात येणाऱ्या लोकांना आपली वाहने उभी करून ठेवण्यासाठी पार्किंगची जागा नसल्याने लोक मिळेल तेथे वाहने उभी करून ठेवत असत. त्‍यामुळे जलस्रोत खात्याकडून पालिकेसमोर असलेल्या कालव्यावर जागा करून खास पार्किंगची सोय उपलब्‍ध करून देण्‍यात आली.

पण तीसुद्धा जागा अद्याप जलस्रोत खात्याकडून पालिकेकडे सुपूर्द न केल्याने केपे बाजारात लोक मिळेल तशी वाहने उभी करून ठेवतात. परिणामी बाजारात वाहतुकीचा खोळंबा होतो.

partially project
Quepem News : बेतूल किल्ला बनणार उत्तम पर्यटनस्थळ ; हवी फक्त इच्‍छाशक्ती

मासळी मार्केट कधी कार्यरत होणार?

काराळी-केपे ते तिळामळ या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला बाबू कवळेकर आमदार असताना सरूवात झाली होती. पण नंतर हे कामही रखडून पडले. केपे बाजाराचा विकास होणे गरजेचे असून येथे येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत.

केपे बाजारात मासळी तसेच भाजीविक्री करण्यासाठी जागा नसल्याने सध्या मासळी मार्केट भाड्याच्या जागेवर चालवले जात आहे.

तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने लोकांना नाक मुठीत धरून यावे लागते. नवीन मार्केट प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी मासळी, भाजीविक्री करण्यासाठी सोय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com