Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Goan Instargram influencer Vardhan Kamat exclusive interview : कंप्युटर इंजिनिअर, नाट्य कलाकार, पालक आणि एक प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर वर्धन कामत यांचा इन्स्टाग्राम प्रवास.
Vardhan Kamat
Vardhan KamatDainik Gomantak

Vardhan Kamat Exclusive Interview

वर्धन कामत गोव्यातील एक प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर, त्यांच्या मुलांचा गोड आवाज, निरागस हावभाव आणि त्यातून निखळ विनोद निर्मितीवर गोव्यासह महाराष्ट्र आणि विदेशातील लोक भरभरुन प्रेम करतात.

स्वत: एक नाट्य कलाकार असणाऱ्या वर्धन कामत यांच्या सोशल मिडिया (Instagram) वरील प्रवास कसा होता? इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे त्यांच्या हातून अ‍ॅड कशी निसटली? व्ह्यूज, लाईक्स, कंटेट, मुलांच काम यासाठी कामत कशी मेहनत घेतात? याबाबत त्यांची सविस्तर मुलाखत.

तुमच्या बद्दल थोडक्यात सांगा (शिक्षण, व्यवसाय, कुटुंब इ.)

माझं शिक्षण कंप्युटर इंजिनिअर आणि MBA (फाइनेंस +मार्केटिंग) पोस्ट ग्रेजुएशन नंतर २ वर्ष स्टॉक ब्रोकिंग मध्ये काम केलं आणि 8 महिने हॉटेल इंडस्ट्रीत सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम केलं. नंतर मुंबईतील कंपनीसाठी गोव्यात एक अस्मेंबली लाइन चालवत होतो. त्यानंतर फैमिली बिझनेस जॉइन केला.

आदर्श ट्रेडर्स या नावाने आमचं ऑफिस आहे. आम्ही ऑफिस स्टेशनरी, कॉर्पोरेट गिफ्टिंग आयटम्स, कॉफ़ीडे चे प्रॉडक्ट्स, इंडस्ट्रियल requirements सप्लाय करतो. कुटुंबात माझी बायको ऋचा, मुले आहन - विवान, माझे आई - बाबा आणि आमचा लाडका फिगो (कुत्रा) आहे.

इंस्टाग्रामवरील प्रवास कसा सुरु झाला? रिल्स कराव्या कधी वाटलं?

सोशल मीडियावर प्रेज़ेन्स असणं अनिवार्य आहे. त्यामुळे काँटॅक्टस वाढतात. कामं मिळतात. यासाठी फेसबुकवर माझे अकाऊंट होतेच पण इंस्टाग्राम खूपच ट्रेंडिंग होतं. जवळपास 4-5 वर्ष माझा इन्स्टाग्राम अकाऊंट डॉर्मेंट होता. असून नसल्यासारखा. 1,475 फॉलोअर्स होते.

एकदा एका अ‍ॅड एजन्सीने कामासाठी फ़ोन केला. दिल्लीत एका अ‍ॅडच चित्रीकरण होणार होतं. त्यांना माझे फोटोग्राफस आवडले आणि त्यानी ऑडिशनसाठी स्क्रिप्ट पाठवली.

शूटच्या तारखा ठरल्या आणि त्यांनी अवांतर माहिती देण्यासाठी मला फ़ोन केला तेव्हा एक प्रश्न विचारला. इन्स्टाग्राम वर तुमचे फॉलोअर्स किती आहेत? 1,475 असं सांगितल्यावर ते म्हणाले सॉरी सर. आपल्याला बरोबर काम नाही करता येणार.

हाच ट्रिगर पॉइंट होता माझ्यासाठी. मुलांसोबत रील्स करण्यापूर्वी मी अजून 2-3 गोष्टी ट्राय केल्या. जसं की कॅप्टन जॅक स्पारोचा कॅरॅक्टर करून गिव्हवे देण. पण हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

आणि मुलांसोबत सुद्धा ठरवून अस काही केलं नाही. अपघाताने व्ह्यूज मिळत गेल्या. जेव्हा व्ह्यूज वाढायला लागलेत तेव्हा लक्षात आलं की हे काम करतंय.

Vardhan Kamat
Vardhan KamatDainik Gomantak

सुरुवातीला प्रतिसाद कसा होता? कंटेट निर्माण करण्याची प्रक्रिया कशी असते?

मुलांच्या रील्स ना व्ह्यूज मिळायला लागल्यानंतर अचानक फॉलोअर्स मध्ये वाढ व्हायला लागली. इन्स्टाग्रामवर अनपेक्षीतपणे खूपच प्रेम मिळालंय. मी खूप ग्रेटफुल आहे. कंटेंट आजपर्यंत आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीमुळेच तयार झालाय.

आहन खूपच हजरजबाबी आहे. कायम काही ना काही प्रश्न विचारत असतो. त्यामुळे कंटेंटच सीड त्याच्या बोलण्यामधून तयार होत. त्यानंतर मी ते स्क्रिप्ट करतो. पण सोसायटी, आपल्या कुटुंबात होणारी चर्चा, शेजारी, दैनंदिन ऍक्टिविटीज, ह्यामुळे कंटेंट मिळत जातो. वेगळा विचार करावा नाही लागत.

Vardhan Kamat With Wife And childrens
Vardhan Kamat With Wife And childrensDainik Gomantak

तुमच्या रील्सच्या केंद्रस्थानी तुमचीच मुले असतात त्यांना यासाठी तयार कसे केले? सुरुवातीला काही आव्हाने आली का?

स्क्रिप्ट तयार झाल्यावर नाटकासारखीच त्या रीलची तालीम होते. पॉझ, व्हॉईस मॉड्युलेशन, त्याचं फ्रेमिंग, कंपोझिशन, शेवटचा पंच काय असेल. मांडतो तो विषय ट्रेंडिंग आहे का? takes-retakes ही सामान्य प्रक्रिया असते.

सुरवातीला मी त्यांच्याकडून इम्प्रोव्हाईज करुन घेतलीत ज्यामुळे दिलेल्या एका मुद्द्यावर स्क्रिप्ट तयार न करता ते बोलायला लागले. या सरावामुळे त्यांच्यात कॉन्फिडेंस निर्माण झाला. आहन अत्यंत मूडी आहे. त्याचा मूड संभाळून रील पूर्ण करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.

सतत वेगवगळं आणि रिलेव्हंट कंटेट तयार करणं एक आव्हान असतं, ते कंटेट कसं शोधता किंवा एखाद कंटेट तयार करण्याची तुमची प्रक्रिया काय असते?

एक रील वायरल झालं की खरच प्रेशर येतो कारण त्याच्यानंतर तयार होणाऱ्या रीलवर प्रत्येकाची नजर असते. त्याची माती झाली तर प्रतिष्ठेचा प्रश्न येतो. त्यामुळे विषय त्यातील वेगळेपण यावर मी जास्त भर देतो. आत्तापर्यंत सहजतेने सगळं घडत गेलंय. तसंच पुढेही होईल अस वाटतंय.

तुमचं कोणत्या प्रकारचं कंटेट जास्त चालतं? तुमचा ऑडिएन्स कोण आहे असं तुम्हाला वाटतं?

लहान मुलांनी मोठ्याना शहाणपण शिकवणं खूपच ट्रेडिंग आहे सध्यातरी. पण लोकांची टेस्ट कधीही बदलू शकते. ऑडिएन्सच्या आवडीनुसार कंटेंट बनवणं मला उचित वाटतं. कारण तेच आपले मायबाप सर्वस्व असतात.

तेच तुम्हाला उचलून धरतील किंवा तेच तुम्हाला खाली खेचतील. माझा ऑडिएन्स मोस्टली कोकणी मराठी माणंस आहेत. गोवा, महाराष्ट्र, कॅनडा, अमेरिका, ऑस्टेलिया इथे माझ कंटेंट बघितलं जातं.

रील्स चित्रीकरण, एडिट, साऊंड याच कशाप्रकारे नियोजन करता, यासाठी कोणाची मदत होते का? स्वत:च सगळं करता?

सध्यातरी हे सगळं मीच मैनेज करतो. टीम नाहीये. रील पोस्ट केल्यावर येणारे लाइक्स, शेअर्स, कॉमेंट्स्ना पण मीच रेस्पॉन्स देतो. बेसिकली हे सगळं स्वतः करण्यात खूप मजा असते. फॉलोअर्ससोबत वैयक्तिक संबंध तयार होतो. त्यांची अभिरुची समजते. आणि महत्त्वाच म्हणजे मेकॅनिकल नाही होत.

सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काय आव्हान येतात तुम्हाला? सध्या निवडणुकीचे वातावरण आहे प्रचारार्थ रिल्स करण्यासाठी विचारणा होते का?

काही कमेंट्स वाचल्यावर खूप मानसिक त्रास होतो. एकेकदा वाटतं इथेच बंद करावं पण आत्ता सवय झाली आहे. सातत्याने चांगला कंटेंट बनवण हे मोठं आव्हान आहे. अजूनपर्यंत तरी निवडणुकीसाठी कुणीही संपर्क केलेला नाहीये. काही वैयक्तिक, काही ब्रॅण्ड विचारायला लागलेत.

लाईक्स, फॉलोअर्स वाढवण्यासाठी लहान मुलांना Reels मध्ये आणलं जातंय अशीही टीका केली जातेय. यावर तुमचे मत काय?

स्वतःचा मुलगा मोठा होऊन काय होणारे ह्याचं अनुमान कोणीच नाही लाऊ शकत. नाटक ही एक कला आहे. आणि गेली 23 वर्ष मी नाटक करतो. माझ्या मुलांनी माझे फुटस्टेप्स फॉलो करावेत अस कुठल्याही बापाल वाटण साहजिक आहे.

मग मी माझ्या मुलाना फिल्म किंवा नाटकासाठी तयार करतोय आणि रिल्सच्या माध्यमातून त्यांचं काम जगभर पाहील जातंय तर त्यात गैर काय आहे?

Vardhan Kamat Father And Mother
Vardhan Kamat Father And MotherDainik Gomantak

तुमचे आत्ताचे फॉलोअर्स 41.8K ऐवढे आहेत. हा पल्ला गाठायला किती वेळ लागला?

ज्यादिवशी आर्टिकल 370 रिलीज झाला म्हणजे. 23 फेब्रुवारी 2024 त्या दिवशी सुद्धा फॉलोअर्स अंदाजे 1,600 होते. आणि आज 24 एप्रिलला 40 हजार पार झालेत.

तुमच्या पत्नीबद्दल काय सांगाल. त्यांची भेट कशी झाली. त्यांचा रिल्समध्ये किती सपोर्ट असतो?

1998 पासून तिला ओळखतो. शाळेतली मैत्रीण. पहिलं क्रश, पहिलं प्रेम. ती माझ्या कलेसाठी खूप सपोर्टीव्ह आहे. ती एक उत्तम हाउसवाइफ , सुगरण आहे. मी नसताना तिने माझ्या फॅमिलीची काळजी घेतलेली आहे. एक डेडिकेटेड आई. ती माझ्या आयुष्यात आल्याचा मला खूप आनंद आहे. माझ्या चढ-उतारात ती नेहमीच माझ्यासोबत असेल.

महत्वाचं! इन्स्टाग्राममधून पैसे मिळतात का? मिळतात तर किती?

इन्स्टाग्रामवर पैसे कमवण हे माझं ध्येय नाहीये. नाटकात किंवा फिल्म मध्ये काम करण माझं पॅशन आहे. माझ्या पॅशनमुळे मला खूप समाधान मिळत जे माझ्यासाठी पैशांपेक्षा श्रेष्ठ आहे. ह्याचा अर्थ मी सगळच मोफत करतो अस नाहीये.

माझ्यासाठी माझी आणि माझ्या मुलांची नाट्यकला अधिक महत्त्वाची वाटते. माझ्या अकाऊंटवर रोजरोज प्रमोशनच्या एड्स दिसणार नाही. कारावीशी वाटली, माझ्या कान्शन्सला पटत असेल, त्यातून थोडेफार पैसे मिळत असेल तरच मी करेन.

इन्स्टाग्रामवर तरुणपीढी सक्रिय असते, त्यांना काय सल्ला द्याल, नव्याने रिल्स बनवणाऱ्या काय सूचना द्याल?

Think original. Don't copy. leave Your own footprints behind. ( वेगळा विचार करा. कॉपी करू नका. स्वत: च्या पाऊलखुणा मागे सोडा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com