गोमंतकीय रंगभूमीवरील कलाकारांचा सार्थ अभिमान! वर्षा उसगावकरांचे प्रतिपादन; वळवईत ललितप्रभा नाट्य मंडळाची 105 वर्षपूर्ती

Varsha Usgaokar: गोव्यातील कलाकार लीलया वावरतात तेव्हा मला त्यांचा खूप अभिमान आणि आनंद वाटतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.
Varsha Usgaokar
Varsha UsgaokarDainik Gomantak
Published on
Updated on

सावईवेरे: अतिशय समृद्ध आणि श्रीमंत असलेल्या मराठी रंगभूमीवर जेव्हा गोव्यातील कलाकार लीलया वावरतात तेव्हा मला त्यांचा खूप अभिमान आणि आनंद वाटतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.

आपल्या पूर्वज कलाकारांनी कसलेही प्रशिक्षण न घेता मराठी रंगभूमी सांभाळली ती जपून ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वळवई गावात इ. सन १९२० साली संस्थापित ललितप्रभा नाट्य मंडळाचा शतकोत्तर १०५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयाजित नाट्यमहोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी सभागृहात कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी आमदार गोविंद गावडे, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, बेतकी-खांडोळाचे जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य श्रमेश भोसले, तारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तारी, पत्रकार नरेंद्र तारी, ललितप्रभा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल सावंत, आयोजन समितीचे अध्यक्ष किसन फडते व कार्याध्यक्ष ब्रह्मानंद धारगरळकर उपस्थित होते.

वर्षा उसगावकर पुढे म्हणाल्या की, माझा आत्मा सदैव संगीत व नृत्य कलेमध्ये होता. यासाठी मला माझ्या आई वडिलांनी सदैव पाठिंबा दिला.

मी कलेची मुळाक्षरे गोमंतकातच गिरविल्यामुळे आज मी मोठ्या आत्मविश्वासाने रंगभूमीवर व सिनेमा क्षेत्रात वावरत आहे. मला गोमंतकीय असल्याचा सार्थ अभिमान आहे.

आमदार गोविंद गावडे म्हणाले की, कलात्मकदृष्ट्या लखलखणाऱ्या अशा ललितप्रभा संस्थेने १०५ वर्षांपूर्वी नाट्य संस्काराचे बीज रोवले होते त्याचे आता वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. आजच्या नवोदित कलाकारांनी ही नाट्य परंपरा तसेच लोककलेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

Varsha Usgaokar
Marathi Drama Competition: नाट्यस्पर्धांत नव्या संहितांची कमतरता का?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कृष्णा साळकर यांनीही दृकश्राव्य पद्धतीने संस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर तारी व विनायक वेंगुर्लेकर यांनीही विचार मांडले.

सर्वप्रथम वर्षा उसगावकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सुंदर अशा भरतनाट्यम श्री गणेश नृत्याने व नांदी सादरीकरणाने सोहळ्याची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्‍घाटन करण्यात आले. किसन फडते यांनी स्वागतपर विचार मांडले.

Varsha Usgaokar
Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

कलाकारांचा सत्कार

संस्थापक सदस्य तसेच विद्यमान पंच्याहत्तर वर्षावरील कलाकार व मंडळाचे १९७२ साली ललितप्रभा नाट्यमंडळ नामांकन करणारे व संस्थेला सरकार मान्यता मिळवून देणारे कार्यकारी सदस्यांचा व ज्येष्ठ कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com