Valpoi: वाळपईतील खचलेल्या रस्त्याची अखेर डागडुजी! माती वाहून जाण्याचा प्रकार थांबला, नागरिक समाधानी

Valpoi Road: वाळपई भागात संततधार होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मान्सूनपूर्व कामांवर मोठा परिणाम झाला आहे.
Valpoi Road
Valpoi Road NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदलेल्या चरातील माती वाहून  जाण्याचा प्रकार वाळपईत घडला होता. परिणामी रस्ते चिखलमय झाले होते. यासंबंधी ‘गोमन्तक’मध्ये बातमी प्रसिध्द होताच संबंधित कंत्राटदाराने चर बुजवल्या.

वाळपई भागात संततधार  होत असलेल्या पावसामुळे जनजीवन  विस्कळीत झाले असून  मान्सूनपूर्व कामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत पाऊस कमी होत नाही, तोपर्यंत ही कामे पूर्ण होणार नाहीत.

सकाळपासून  टप्याटप्याने चर बुजवण्यासाठी  दगड घातले जात होते. व्याघ्रेश्वर सदनच्या रस्त्यावर आज संध्याकाळी दगड घालुन तात्पुरती सोय केली आहे. मात्र लवकरत लवकर रस्ता सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, सध्या केलेल्या दुरुस्तीमुळे  येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Valpoi Road
Goa Rain: धुमाकूळ! 2 दिवसांत रस्ता वाहून गेला, 10 पेक्षा अधिक कारचे नुकसान; 25 ठिकाणी घरांसह वीजवाहिन्यांना फटका

पाऊस कमी झाला नाही तर दगडावरच वाहने हाकावी लागणार का, दगड ही तात्पुरती सोय, नाही तर या ठिकाणी वारंवार वाहतुकीसाठी अडथळा  निर्माण होणार असून अपघात होण्याची शक्यता आहे. वाळपई नगरगाव मार्गावर सकाळी दुचाकीस्वार महिला खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना घडली. पावसामुळे खोदलेले रस्ते चिखलमय झाले असून काही वेळा खोदलेल्या रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Valpoi Road
Valpoi: देशासाठी एकत्र येण्याची हीच वेळ! ‘सिंदूर यात्रे’त आरोग्यमंत्री राणेंचे प्रतिपादन; वाळपईत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सर्वत्र पाणीच पाणी

अवकाळी पावसाचा फटका मान्सूनपूर्व कामांवर झालेला आहे. घरे दुरुस्त करणे, पावसाळ्यात लागणारे साहित्य खरेदी आदी कामांवर मोठा परिणाम झाला आहे. वाळपईतील सरकारी कार्यालयांच्या दुरुस्तीकामावरही पावसाने पाणी फेरले आहे. पावसाळ्यात गळती होण्याऱ्या सरकारी इमारतीचे छत दुरुस्तीचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यामुळे अजून काही इमारतीची दुरुस्ती सुरू आहे. त्यात वाळपई पोलिस स्थानक व बाल भवनच्या छताचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उच्च माध्यमिक विद्यालयाची  बाजूची  इमारत,  तालुका ग्रंथालयाचे पूर्ण छत काढलेले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com