Goa Rain: धुमाकूळ! 2 दिवसांत रस्ता वाहून गेला, 10 पेक्षा अधिक कारचे नुकसान; 25 ठिकाणी घरांसह वीजवाहिन्यांना फटका

Pre Monsoon Rain Goa: म्हापसा, शिवोली, पर्वरी व इतर ठिकाणी झाडांची पडझड होऊन वीजवाहिन्या तुटल्या. अग्निशमन दलाने ही झाडे कापून काढल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला.
Pre Monsoon Rain Goa
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: मंगळवार(ता.२०)पासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर बार्देशात गुरुवारी (ता.२२) तिसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कळंगुटमध्ये खोब्रावाडा येथे आंब्याच्या झाडाची फांदी पाच गाड्यांवर कोसळली, तर उमतावाडा येथे व्हिन्सेंट परेरा यांचे घराचे छत कोसळले. यात सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.

बार्देशात बुधवारी (ता.२१) जवळपास २३ ठिकाणी झाडांची पडझड झाली. म्हापसा, पर्वरी व पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी कोसळलेली झाडे कापून बाजूला केली. सोनारभाट-रेईश मागूश येथे श्री भूमिपुरुष मंदिरावर मागील बाजूचे भलेमोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत मंदिराची मोठी हानी झाली. सावळे-पिळर्ण येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले.

तसेच रेवोडा, थिवी, म्हापसा, शिवोली, पर्वरी व इतर ठिकाणी झाडांची पडझड होऊन वीजवाहिन्या तुटल्या. अग्निशमन दलाने ही झाडे कापून काढल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. वेरे येथे एका बंगल्याच्या आवारातील आंब्याचे झाड आणि संरक्षक भिंत दुचाकी व कारवर कोसळले. या दुर्घटनेत सुमारे १.१० लाखांचे नुकसान झाले.

डिचोलीत धुमाकूळ

अवकाळी पावसाचा डिचोलीत धुमाकूळ सुरूच असून, सलग तिसऱ्या दिवशी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी दिवसभर भरपूर पाऊस पडला.

जोरदार पावसाच्या तडाख्यात आज दिवसभरात एका घरावर मिळून पाच ठिकाणी झाडांची पडझड झाली. या पडझडीत मोठीशी आपत्ती ओढवली नसली, तरी वीज खात्याचे मिळून तीन लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सत्तरीला वादळी वाऱ्यापावसाचा तडाखा

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातला आहे. त्यात सत्तरीत वादळी वाऱ्या-पावसामुळे अनेक भागात झाडांची पडझड सुरू आहे. पावसाने गुरुवारी (ता.२२) मोठा जोर धरला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वांची तारांबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळपासून वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच होती. त्यात वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळ गुलमोहराचे झाड रस्त्यावर पडले. ब्रह्मकरमळी-सत्तरी येथे रस्त्यावर झाड पडून रस्ता बंद झाला. भिरोंडा-सत्तरी येथील पंचायतीजवळ झाड रस्त्यावर आणि वीजवाहिनीवर पडून नुकसान झाले. गावकरवाडा-वांते-सत्तरी येथे रस्त्यावर व वीजवाहिनीवर रानटी झाड पडले. सालेली-सत्तरी येथील बसबांधणी प्रकल्पाजवळ रस्त्यावर आणि वीजवाहिनीवर रानटी झाड पडले. वाळपई-नगरगाव मार्गावर कडुलिंबाचे झाड वादळी वाऱ्यामुळे मोडून पडले.

घोगळ येथील रस्ता गेला वाहून

कुडतरी मतदारसंघातील घोगळ येथील मडगाव नगरपालिकेच्या प्रभाग २५ मधील एक रस्ता अवकाळी पावसामुळे नाहीसाच झाला आहे. या रस्त्याचे हल्लीच डांबरीकरण झाले होते. मात्र, दोन दिवस पाऊस पडताच हा रस्ताच वाहून गेल्याचे दृश्‍य आहे.

रस्त्यावरून पाणी वाहत आहे. रस्त्यावरून वाहने नेणे सोडाच चालत जाणेही शक्य होत नाही व धोक्याचे बनले आहे. तेथील एका रहिवाशाने सांगितले की, या रस्त्याच्या दशेला कोणाला दोष द्यावा; आमदाराला, नगरसेवकाला की सार्वजनिक बांधकाम खात्याला. रस्ता वाहून गेल्यानंतरची परिस्थिती पाहता रस्त्यासाठी ज्या सहित्याचा उपयोग केला ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Pre Monsoon Rain Goa
Goa Rain: पहिल्याच पावसात 'रस्ता' गेला वाहून; केरये-खांडेपारमध्ये शेतात घुसली माती, बळीराजा हवालदिल

कळंगुटमध्‍ये पाच कारगाड्यांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे गुरुवारी (ता.२२) दुपारी खोब्रावाडा-कळंगुट येथे पार्क करून ठेवण्यात आलेल्या एकूण पाच कारगाड्यांवर आंब्याचे भलेमोठे झाड कोसळले. या घटनेत पाचही कारगाड्यांचे मोठे नुकसान झाले असून मालकांना सात ते आठ लाखांचे नुकसान झाल्याची

माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाचही कारगाड्यांवर कोसळलेले आंब्याचे झाड दूर केले व तेथील परिसर मोकळा केला.

Pre Monsoon Rain Goa
Goa Rain: लाखोंचे आर्थिक नुकसान! मुसळधार पावसामुळे घरे-झाडांवर संक्रांत, वाहनांची हानी, वीज खात्यालाही मोठा फटका

मरड-म्हापसा येथील नाल्याचे काम भरपावसात सुरू

जलसिंचन खात्यातर्फे म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभाग १९ मधील नाल्याचे साफसफाई काम लाखो रुपये खर्च करून करण्यात येत आहे. मात्र पोकलीनमध्‍ये बिघाड झाल्याने हे काम आठ दिवस पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे काल पडलेल्या पहिल्याच पावसात मरड-म्हापसा येथील सरकारी इमारतीजवळील सर्व दुकाने पाण्याखाली गेली. तर, ‘बार्देश बझार’मध्ये पाणी घुसले व मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com