Valpoi News : होमगार्डनी पोलिसांप्रमाणेच लोकसेवेचा भार घ्यावा; पोलिस महासंचालक जसपाल सिंग

Valpoi News : वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज झालेल्या २६१ होमगार्डच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ४५ दिवस प्रशिक्षण घेतलेले होमगार्ड आजपासून सेवेत नियुक्त झाले आहेत.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई,पोलिसांप्रमाणेच होमगार्ड देखील समाजातील महत्त्वाचा जबाबदार घटक आहे. प्रामाणिक जनहित सेवेव्दारे होमगार्डला राष्ट्रपतिपदकाचा मान मिळत असतो. म्हणूनच समाज, देश सुरक्षेत कार्यरत राहिले पाहिजे.

पोलिस विभागाप्रमाणेच होमगार्ड हे महत्त्वपूर्ण अंग आहे. त्यामुळे होमगार्डनी देखील पोलिसांप्रमाणेच लोकसेवेचा भार आपल्या खांद्यावर घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केले.

वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज झालेल्या २६१ होमगार्डच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ४५ दिवस प्रशिक्षण घेतलेले होमगार्ड आजपासून सेवेत नियुक्त झाले आहेत. जसपाल सिंग म्हणाले, होमगार्डची सेवा ही गर्व निर्माण करणारी असते. म्हणूनच आपले काम निःपक्षपातीपणे केले पाहिजे. निवडणूक केंद्रावरही पोलिसांसोबत होमगार्डचे कार्य असते. निःपक्षपातीपणे निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. आपल्या गणवेशाचा अभिमान बाळगला पाहिजे. अनुशासनाव्दारे जनसेवा केली पाहिजे. रस्ता सुरक्षा ही फार मोठी जबाबदारी असते. वाढते रस्ते अपघात चिंतेची बाब बनलेली आहे. आपल्या पदाचा चांगल्यासाठीच वापर केला पाहिजे.

Valpoi
Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

जसपाल सिंग यांनी पथकाच्या संचलनाची पाहणी केली. होमगार्डनी सिंग यांना संचलनाव्दारे मानवंदना दिली. अमित नाईक यांनी सूत्रनिवेदन केले. होमगार्ड कल्पिता घोलतेकर, मंजुनाथ च्यारी यांना इनडोअर, तर निंगप्पा वालेकर, सोनाली बी. गावकर यांना आऊट डोअर व उत्कृष्ट होमगार्ड म्हणून विजय वेळीप यांना चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. प्राचार्य सुनिता देसाईंनी स्वागत केले.

यावेळी आयजीपी ओम वीरसिंग, केंद्राचे उपप्राचार्य नेलोस्को रापोस, एसपी राहुल गुप्ता, सुनिता सावंत, धर्मेश आंगले, राजू राऊत देसाई, एसिल्डा डिसोझा, किरण पोडवाल, अक्षत कौशा आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com