Valpoi News: वाळपईत शिवाजी महाराज पालिका उद्यानाला मिळणार नवीन झळाळी!

3 कोटींचा निधी मंजूर : सौंदर्यीकरण कामाचा आज प्रारंभ
Chhatrapati Shivaji Maharaj Udyan
Chhatrapati Shivaji Maharaj UdyanDainik Gomantak

Valpoi News: वाळपई शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिका उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्‍य सरकारच्या नगरविकास प्राधिकरणाने या उद्यानाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत.

उद्या बुधवार दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या हस्ते उद्यानाच्या कामाचा शुभारंभ करण्‍यात येईल. त्यामुळे या उद्यानाला नवीन झळाळी प्राप्त होणार आहे‌.

वाळपई नगरपालिका उद्यानाला नवीन स्वरुप प्राप्त व्हावे यासाठी अनेक स्‍तरांतून मागणी होत होती. त्याची दखल घेऊन हा प्रकल्प नव्याने हाती घेण्यासाठी विश्‍वजीत राणे यांनी प्रयत्‍न केले.

सत्तरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळपई शहरातील पालिका उद्यानात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Udyan
Chala Hawa Yeu Dya: भाऊ, कुशल, श्रेयाचा गोव्यात सन्मान; मिळाली अमूल्य भेट

या उद्यानाला शिवरायांचे नाव देण्यात आले आहे. यामुळे या पालिका उद्यानाचे सौंदर्यीकरण व्हावे व त्‍यास नवीन झळाळी प्राप्त करून द्यावी, अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिक करीत होते.

यासंदर्भात सरकारने प्रस्ताव सादर केला होता. त्‍यास नगरविकास प्राधिकरणाने मंजुरी दिली असून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नगरपालिका उद्यानाला नव्याने झळाळी देताना बसण्यासाठी बाक, फिरण्यासाठी सोय, जमिनीवर हिरवळ, बाजूला झाडे व मुलांना खेळण्यासाठी सोय करण्यात येणार आहे. उद्यानाच्या पाठीमागे नदी असल्याने संरक्षण भिंत उभारण्यात येईल.

Chhatrapati Shivaji Maharaj Udyan
Goa Water Supply: माडेलमध्ये एकीकडे जलवाहिनी फुटली तर रस्ताही खचला; पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

आणखी दोन विकासकामांचे लोकार्पण

वाळपई नगरपालिका उद्यानाच्‍या कामाबरोबरच नाणूस येथील ‘म्हशीचे मळ’ येथील मैदानाच्या कामाचा शुभारंभ उद्या बुधवारी करण्‍यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी उसगाव येथील मार्केट कॉम्प्लेक्स इमारतीच्या कामाचा आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्‍यात येईल. यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे, वाळपई नगराध्यक्ष शहजीन शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com