Valpoi Police Custody Assault: उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची उचलबांगडी! पोलिस कोठडीत मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही व्हिडिओमुळे खळबळ

PSI Prathamesh Gawas Transfer: कथित मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली असून प्रकरणी उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची राखीव दलात बदली करण्यात आली आहे.
Valpoi Police Custody Assault Case
PSI Prathamesh Gawas TransferDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: वाळपई येथील मोईन शेख याला पोलिस कोठडीत कथित मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली असून प्रकरणी उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची राखीव दलात बदली करण्यात आली आहे.

वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती देत पुढील कारवाई प्रलंबित असल्याचे सांगितले. या प्रकरणात उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांच्यासह एका एएसआय व चार पोलिस कर्मचाऱ्यांकडून मोईनवर मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर वाळपई पोलिस स्थानकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Valpoi Police Custody Assault Case
Valpoi Police : शिगमोत्सवात हरवलेल्या 4 वर्षाच्या मुलाचा अखेर शोध लागला; वाळपई पोलिसांची कामगिरी

कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिस अधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या उपस्थितीत पाहण्यात आलेल्या या फुटेजमध्ये पाच जण मोईन शेखला मारहाण करत असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

विश्वजीत राणेंचे डीजीपींना पत्र

या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पोलिस महासंचालक आलोक कुमार यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवले असून मोईन शेख मृत्यू प्रकरणाची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे. पत्रात संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे राणे यांनी अधोरेखित केले आहे.

Valpoi Police Custody Assault Case
Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

कारवाईची मागणी

आज सकाळपासून मोईन शेख यांचे कुटुंबीय व स्थानिक नागरिक वाळपई पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन करत असून उपनिरीक्षक प्रथमेश गावस व संबंधित चार पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ अटक व निलंबनाची मागणी करीत आहेत. मोठ्या संख्येने नागरिक जमल्याने पोलिस स्थानक परिसरात तणाव वाढला आहे. पोलिस उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांनी या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com