Valpoi News : धोंडगणांनी पार केले ‘अग्निदिव्य’

नाणूस जत्रोत्सव : आरोग्यमंत्र्यांसह हजारो भक्तगणांनी घेतले कळसाचे दर्शन
 अग्निदिव्य भक्तगण
अग्निदिव्य भक्तगणDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News : नाणूस येथील देवस्थानाच्या जत्रोत्सवात सुमारे शंभर धोंडगणांनी अग्निदिव्य पार केले. या गावातील धार्मिक संस्कृतीच्या क्षेत्रात या जत्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिरगाव येथील सुप्रसिद्ध लईराई देवस्थानाच्या पूर्वी होणारा हा जत्रोत्सव म्हणजे लईराई देवीच्या जत्रेची सुरुवात असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

नाणूस-बेतकेकरवाडा येथील सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा सुप्रसिद्ध जत्रोत्सव रविवार, २६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी भेट देऊन देवाच्या कृपाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान, रविवारी रात्री ९ वाजता सातेरी देवस्थानाच्या प्रांगणातून देवीची कळस मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत महादेव देवस्थानाकडे आली. यावेळी देवस्थानचे व्रत पाळणारे सर्व धोंड या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा जयघोष करीत ही मिरवणूक रात्री १० वाजता महादेव देवस्थानात पोहोचल्यानंतर लिलावाची प्रक्रिया हाती घेण्यात आली.

 अग्निदिव्य भक्तगण
Nanus Fort : गोवा मुक्ती लढ्यातले क्रांतीवीर दीपाजी राणे यांचे नाणूस किल्ल्यावर होणार स्मारक

नंतर मध्यरात्री गावातील नाट्यकलाकारांचा सामाजिक नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. पहाटे ३.३० वाजता व्रतस्थ धोंडगणांनी अग्निदिव्य पार केले. अग्निदिव्य पार केल्यानंतर सकाळी ११ वाजता भाविकांना कौल देण्यात आला.

सोमवारी देवीचे कळस गावातील प्रत्येक घराघरांत गेले. यावेळी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी देवाची भेट घेऊन देवाच्या कृपाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

शेकडो वर्षांची परंपरा

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस-बेतकेकरवाडा हा गाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा हा जत्रोत्सव गोमंतकात सुप्रसिद्ध आहे. जत्रोत्सवात गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी धोंडगणांचे व्रत पंधरा दिवसांपासून सुरू करतात.

 अग्निदिव्य भक्तगण
Goa Budget Session 2023-24: जलक्रीडा दलालांच्या विळख्यात; पर्यटनमंत्र्यांची कबुली

वाळपईत अशा प्रकारची भव्य अशी जत्रा साजरी होणे म्हणजे आपली संस्कृती टिकवून ठेवणे व गावाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होणे आहे. आपले सण, उत्सव, गावागावांतील धार्मिक परंपरा यादेखील जीवनातील अविभाज्य घटक आहेत. गावात अनेक प्रकारची मंदिरे आहेत. ही मंदिरे लोकांना एकत्र आणण्याचे माध्यम आहे. गावची मंदिरे सुसज्ज व्हावीत यासाठी आपले सदैव प्रयत्न असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com