वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळूस येथील रस्त्याची दयनीय अवस्था बनलेली आहे.रस्त्यावर खड्डे पडून डबकी साचलेली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालवणे चालकांना त्रासदायक ठरत आहे.
येथील सुमारे दीडशे मीटर लांब रस्ता वीज केबल घालण्यासाठी जानेवारीत खोदण्यात आला होता. मात्र सात महिने उलटले तरीही रस्ता दुरुस्त केलेला नाही. रस्ता खोदण्याच्या अगोदर दुरुस्ती कामाचे नियोजन सरकारने केले नाही. त्यामुळे सरकार या भागात अपघात होण्याची वाट बघत आहे काय, असा संतप्त सवाल लोक करीत आहे.
हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा झाला आहे. आता श्रावण सण, नागपंचमी, चतुर्थी आदी सणावेळी लोकांची ये जा वाढणार आहे. यासंदर्भात आंबेडे येथील माधव वझे म्हणाले की, नगरगाव भागातून अनेकजण रोज वाळपईत जातात. वेळूस भागात चालकांना वाहन चालविताना नाकीनऊ येते. येथे दोन वाहने सुटणार नाही अशी स्थिती आहे.
जानेवारीत खोदलेला रस्ता उन्हाळ्यात दुरुस्त करण्याची जबाबदारी शासनाची होती. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्डेमय रस्त्यालगतची गटारेही गाळमातीने पूर्णपणे भरली आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबून राहाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.