वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 8 मधील मुबारक अली खान यांच्या बेकायदेशीर रीत्या बांधलेल्या बंगल्यावर आज वाळपई नगरपालिकेने धडक कारवाई करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची सुरुवात केली आहे.
यावेळी घटनास्थळी अनेक पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.
मुबारक अली खान यांच्या विरुद्ध 2017 मध्ये अमीन बी शेख, शमसुद्दीनीशा खान, बद्रुनीशा खान, आफताब खान आदींनी बेकायदेशीर बांधकामाविरुध्द न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार 2017 पासून खटला सुरु होता. 2018 मध्येच एकदा न्यायालयातर्फे घर पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र हा खटला उच्च न्यायालयात गेल्याने घर पाडण्यास स्थगिती दिली.
मात्र आता उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे नगरपालिकेने कारवाई करत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुबारक अली यांचे कुटुंबीय घर पाडण्यास अडथळा आणत होते.
त्यानंतर सत्तरी संयुक्त मामलेदार, नगरपालिका मुख्यअधिकारी सूर्याजी राव राणे, नगरपालिका अभियंता हरिष कलंगुटकर, पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते तसेच नगरपालिका कर्मचारी, पोलिस फौज आदींच्या उपस्थितीत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.