Valpoi Market : ‘वाळपई’ बाजाराला स्थैर्य

मिळाले मोठे स्वरूप : ग्राहकांची वर्दळ; व्यावसायिकही वाढले
Valpoi Market
Valpoi Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi Market : वाळपई, वाळपई येथे दर आठवड्याला भरणारा मंगळवारचा बाजार हा वाळपई शहर तसेच ग्रामीण भागासाठी फायद्याचा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळपईत मंगळवारी आठवडी बाजार भरत आहे.

पूर्वी हा बाजार मासोर्डे गावात जाणाऱ्या एकाच रस्त्यावर भरत होता. सर्व प्रकारचे व्यापारी एकाच रस्त्यालगत बसून व्यवसाय करीत होते. पण मागील दहा वर्षांपासून या बाजाराचे विभाजन केल्याने बाजाराला सुरळीतपणा आला आहे.

मासोर्डे गावच्या रस्त्यावरील मार्गावर केवळ कपडे, चप्पल, बॅग या व्यावसायिकांना जागा दिली आहे. तर फळे, भाजी व्यावसायिकांना वाळपई पालिका मैदानाच्या ठाणे रस्ता मार्गावरील रस्त्यालगत बसविले आहे.

त्यामुळे बाजाराच्या विभाजनामुळे वेगळपण जाणवत आहे. पण या मंगळावारी बाजारात भटक्या गुरांचा त्रास येथील व्यावसायिक, ग्राहकांना होत असतो. दिवसभर भटकी गुरे बाजारातून फिरत असतात व अशावेळी साहित्याचे नुकसान करतात.

दिवसेंदिवस आठवडी बाजारात येत असलेल्या विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ताणही वाढला आहे. ताडपत्रीच्या आधारावर रस्त्यालगत गटारांवर बसविलेल्या लाद्यांवर विक्रेते बसत आहेत. या लाद्या विक्रेत्यांना आधार बनतात. कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून विक्रेते वाळपईत मंगळवारी दाखल होतात. त्यामुळे हा आठवडी बाजार ग्रामीण भागासाठी मुख्य केंद्रबिंदू ठरलेला आहे.

Valpoi Market
Goa Fish Market: परराज्यातून येणारी मासळी खाताय? वेळीच सावध व्हा...

वाळपई शहराला जुना इतिहास आहे. व्यवसायाच्या माध्यमातून अनेक परराज्यातील माणसे जोडली गेली आहेत. त्यातून व्यवसायात वाढ होत आहे. ती वाढ उत्तरोत्तर अशीच वाढत जाण्यासाठी बाजाराला सुविधांचे वैभव प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे. सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

अर्थकारण बदलतेय

बाजारातील अर्थकारण बदलत आहे. पूर्वी कमी प्रमाणात ५० ते ६० विक्रेते येत होते. आता ही संख्या दोनशेहून अधिक झालेली आहे. पूर्वी दुकान व्यावसायिकदेखील कमी होते. आता दुकाने वाढलेली आहेत. वाळपईच्या आठवडी बाजाराचे विभाजन गेल्या काही वर्षांपासून झाल्याने बाजाराला सुटसुटीतपणा आला आहे.

नवीन बाजार संकुलाची गरज

भटक्या गुरांचा संचार बाजारपेठेत असतो. अशावेळी व्यापारी, व्यावसायिकांना त्रास होतो आहे. नवीन बाजार संकुल बांधले गेले तर त्या ठिकाणी सुविधा देता येणार आहेत. तसा विचार सरकारने करण्याची गरज आहे.

त्यात मग शौचालयाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, हातपाय धुण्याची सोय आदी गोष्टींची पूर्तता करणे शक्य होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com