Valpoi News : राजकीय इच्छाशक्ती असल्यास मराठी भाषेला मान शक्य : गो. रा. ढवळीकर

Valpoi News : वाळपई नाणूस येथे मराठीप्रेमींचा स्नेहमेळावा उत्साहात
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यासाठी सध्याच्या काळात तरी आंदोलने झाली नाहीत. देशात भाजप सरकारच्या नेत्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावरच ही गोष्ट शक्य झाली होती. कारण हे कलम हटविणे मोठे धाडसाचे काम होते.

त्याच धर्तीवर गोव्यात गेल्या शेकडो वर्षापासून लोकांनी मराठी भाषा संवर्धित केलेली आहे. मराठीला कायदेशीर राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी बरीच वर्षे चळवळी सुरू आहेत. सरकार दरबारी इच्छाशक्ती असल्याच मराठी भाषेला कायदेशीर मान मान मिळणे शक्य आहे, असे प्रतिपादन गो. रा. ढवळीकर यांनी केले.

नाणूस - वाळपई येथे आज जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमी, मराठी भाषा, शिक्षण, साहित्य, संस्कृती व कलाप्रेमींच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार प्रभाकर ढगे, विवेकबुवा जोशी, ॲड. शिवाजी देसाई यांची उपस्थिती होती.

प्रभाकर ढगे म्हणाले, नाट्य परंपरेची गंगोत्री गोव्यात आहे. मराठी भाषेतून पहिली मराठी नाटककार हिराबाई पेडणेकर या गोव्यातील होती. सत्तरीने मराठी साहित्याचे पालन पोषण केले. भाषा मोठी होण्यासाठी सर्व भाषांना समाविष्ठ केले पाहिजे. तरच एखादी भाषा सशक्त होत असते. इंग्रजी भाषेने सर्व भाषा स्वीकारल्या आहेत. मराठी भाषा ही गोव्याची दक्षिण काशी होती. मराठी भाषेचा जागर झाला पाहिजे.

विवेकबुवा जोशी म्हणाले, की सत्तरीत मराठी भाषेसाठी प्रत्येक क्षेत्रातून योगदान लाभले आहे. ते गौरवास्पद आहे. प्रत्येकाने मराठी साहित्य वाचले पाहिजे. आपण कीर्तन विद्यालयाच्या माध्यमातून नवी पिढी घडवत आहे. ॲड. शिवाजी देसाईंनी सूत्रनिवेदन केले. विजय नाईक यांनी प्रास्ताविक करून स्नेहमेळावे का गरजेचे आहेत याचे विवेचन केले.

‘मराठीतून पत्रव्यवहार करा’

दुसऱ्या सत्रात चर्चात्मक विषय घेण्यात आला. त्यात अनेक मराठीप्रेमींनी मराठी भाषेच्या प्रचारासाठी विचार मांडले. पुढील कृती, उपक्रम ठरवून समिती गठन करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांनी सरकारी कार्यालयात, बँकेत, संस्थेत अशा ठिकाणी मराठी भाषेतूनच पत्रव्यवहार करावा, असे मत म. कृ. पाटील यांनी मांडले.

Valpoi
Goa Accident Death: कारच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

‘राष्ट्रपतींनीही दखल घेतली नाही’

गो. रा. ढवळीकर म्हणाले, की असे स्नेहमेळावे उपक्रम गरजेचे आहेत. परकीयांनी ग्रंथ जाळले. अनेकांना बाटवले होते, म्हणून लोकांना ग्रंथ वाचण्यास मिळत नव्हते. त्यावेळी ख्रिस्त पुराण मराठीतून लेखन केले होते. एखाद्या भाषेसाठी उदासिनता असते, पण मराठी भाषा कधीही थांबलेली नाही. राष्ट्रपतीकडे देखील घटनेने अधिकार आहेत. त्यांच्याकडे देखील आम्ही दाद मागितली होती, पण यश मिळाले नाही, असे ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com