VIDEO: 'साप दिसला म्हणून मारला ब्रेक, 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या'; रेडीघाटात स्कुटरचा चक्काचूर, एकजण गंभीर जखमी

Valpoi honda road accident: रस्त्यावर अचानक साप दिसल्याने कारचा वेग कमी केल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी आणि ट्रकने धडक दिल्याने तीन वाहनांमध्ये अपघात घडला.
 Snake on road incident
Valpoi honda road accidentDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: रस्त्यावर अचानक साप दिसल्याने कारचा वेग कमी केल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी आणि ट्रकने धडक दिल्याने तीन वाहनांमध्ये अपघात घडला. वाळपई–होंडा मार्गावरील रेडीघाट येथे बुधवारी दुपारी २ वा. ही घटना घडली.

कार, स्कूटर व ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात स्कूटरचालक गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे वाळपई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोमेकॉ येथे हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ वा. वाळपईहून होंडाच्या दिशेने कार, स्कूटर व ट्रक अशी तीन वाहने जात होती. या तिन्ही वाहनांमध्ये कार सर्वात पुढे होती. तिच्यामागे स्कूटर त्यानंतर ट्रक होता. रेडीघाट परिसरात पोहोचल्यावर अचानक कारच्या समोरून एक साप रस्ता ओलांडताना दिसल्याने चालकाने तत्काळ कारचा वेग कमी केला.

 Snake on road incident
Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी

यावेळी मागून येणाऱ्या स्कूटरचालकाला वेग कमी झाल्याचे लक्षात न आल्याने त्याने कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकनेही स्कूटरला धडक दिली. स्कूटरचालक रस्त्यावर फेकला गेला आणि स्कूटरचा चक्काचूर झाला. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले.

 Snake on road incident
Goa News: वीज खांबांवर केबल्सचे 'बेकायदेशीर' जाळे; दोन कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल, वाचा दिवसभरातील घडामोडी

शाळा सुटल्यानंतर जात होते घरी

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव नीलेश नाईक असे आहे. ते वाळपई येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे साखळी येथील रहिवासी आहेत. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये पाच महिन्यांची एक लहान मुलगी होती. ती आपल्या आईसोबत वेळूस येथून डिचोली येथील आपल्या घरी जात होती. अपघात गंभीर असला तरी सुदैवाने त्या बालिकेसह कारमधील सर्वजण सुरक्षित बचावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com