Valpoi News : वाळपईतील धोंड तळांवर हरिनाम यात्रा सुरू; वझे बुवांकडून प्रबोधन

Valpoi News : आज बुधवारी वाळपई भागातील उसगाव येथे पालवाडा मांडूगाळ येथे दहा हजार, व भोम पाडेली येथे ३३ हजार नामजप करण्यात आला.
Valpoi
ValpoiDainik Gomantak

पद्माकर केळकर

वाळपई , सत्तरी तालुक्यात बुधवारपासून धोंडांचे व्रत विविध तळांवर सुरू झाले आहे. अशा धोंड मंडळींसोबत गोव्यातील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे हे गेली १७ वर्षे धोंड मंडळींसोबत लईराई देवी व अन्य देवतांचे नाम स्मरण जप हा सामाजिक उपक्रम राबवित आहेत.

आज बुधवारी वाळपई भागातील उसगाव येथे पालवाडा मांडूगाळ येथे दहा हजार, व भोम पाडेली येथे ३३ हजार नामजप करण्यात आला.

वझे बुवांनी हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविला आहे.

समाजात एकता निर्माण व्हावी, सर्वजण एकत्र नांदावेत, एकमेकांना मदत करून सत्कार्य केले पाहिजे. लईराई धोंड मंडळीचे खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. धोंड भक्तांनी आपली परंपरा जपली आहे. उपवासाचे महत्व जगाला सांगितले आहे.

माणसाने कसे वागावे, सोवळे कसे पाळावे, हे या पाच दिवसांतून कळून येते. आपल्या पूर्वजांनी परंपरा संवर्धित केली आहे. त्याची पाळणूक युवकांनी केली आहे, ही आनंदाची बाब आहे, असे वझेबुवा विविध ठिकाणी मनोगतात सांगतात. लईराई धोंड समवेत वझे बुवांची हरीनाम यात्रेला सुरुवात झाली आहे. वाळपई भागात विविध ठिकाणी ही हरीनाम यात्रा होणार आहे.

Valpoi
Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

भारतीय संस्कृतीचे जतन, संरक्षण व्हावे,यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. हा सेवा भावनेने उपक्रम राबविला जातो. लईराई देवी, ग्रामदेवता, आदींचा जप केला जातो. धोंडांना हिंदू धर्म पालनाचे महत्व सांगितले जाते. धोंडांना भक्तींचे, नामस्मरणाचे, जपाचे महत्व कळावे, हाच आपला हेतू व उद्देश आहे.

सुहास बुवा वझे, कीर्तनकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com