Valpoi News : नाट्य चळवळीमुळे मराठीचे संवर्धन; चर्चासत्रातील सूर

Valpoi News : सत्तरीतील नाट्य दिग्दर्शकांनी उलगडला आपला रंगभूमी प्रवास
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, गोमंतकीय हा नाट्यवेडा आहे. नाटकांमुळे येथे नवे कलाकार घडले तसेच मराठी भाषेलाही उच्च स्थान प्राप्त झाले. दशावतारी नाटके वा हौशी रंगभूमीवर सादर होणारी बहुतेक नाटके ही मराठी असतात.

मराठी नाटकांच्या माध्यमातून गोव्यात मराठी भाषा जिवंत राहिली. मराठी नाटकांनी दिलेले हे योगदान महत्त्वाचे आहे, असा सूर नव्यानेच स्थापन झालेल्या सत्तरी मराठीप्रेमी संस्थेच्या मासिक कार्यक्रमात व्यक्त झाला.

नाणूस येथील गोशाळा केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ''सत्तरीतील हौशी नाट्य रंगभूमी व माझे अनुभव'' यावर एक चर्चासत्र झाले. यात सत्तरीतील नाट्य दिग्दर्शकांनी भाग घेतला. यात गुरुदास सुतार, उदय बर्वे, प्रमोद महाडेश्वर, चंद्रकांत गावस, विनय गावस, विष्णू गावस, दशरथ मांद्रेकर, मनोज बर्वे, अविनाश नाईक आदींचा समावेश होता.

गोशाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी स्वागत केले व सत्तरीतील मराठीप्रेमींनी एक चांगला उपक्रम आयोजित केल्याने समाधान व्यक्त केले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी असे कार्यक्रम आवश्‍यक असल्याचे सांगितले.

नाट्य दिग्दर्शक अविनाश नाईक यांनी आपला नाट्य प्रवास उलगडताना रंगभूमीचा इतिहासही कथन केला. तसेच नवी पिढी नाटकांमध्ये येण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

विष्णू गावस यांनी आपण अपघाताने नाट्य क्षेत्रात आलो. अनेकवेळा स्त्री व पुरुष या दुहेरी भूमिका करण्याची संधी मिळाली. या संधीचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला. यामुळे या क्षेत्रामध्ये यश प्राप्त झाले असे ते म्हणाले.

Valpoi
Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

मनोज बर्वे यांनी काणी तशी जुनीच या नाटकातून आपण या क्षेत्रात पदार्पण केले. कलेचे बाळकडू घरातूनच मिळाले. नाटकाची आवड घरात स्वस्त बसू देत नाही, असे ते म्हणाले. चंद्रकांत गावस यांनी नाटकाची परंपरा सत्तरीत आजही जोमाने सुरू असल्याचे सांगितले. नाट्य दिग्दर्शक म्हणून काम करताना अनेक प्रकारचे अनुभव आले. अनेक अडचणी आल्या, परंतु त्यातूनच नवी प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.

नाट्य दिग्दर्शक प्रमोद महाडेश्वर यांनी सत्तरीतील नाट्य चळवळीचा आढावा घेत नाट्य क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेक कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व. शाबा कुडतरकर हे या क्षेत्रातील महत्त्वाचे घटक होते.

त्यांनी नाटकाच्या माध्यमातून सत्तरीत अनेक कलाकारांना पुढे आणले. आपल्या तालमीत तयार झालेले अनेक कलाकार आज सत्तरीची नाट्य परंपरा पुढे नेत आहेत, याबद्दलत्यांनी समाधान व्यक्त केले.

उदय बर्वे व दशरथ मांद्रेकर यांनीही यांनीही आपल्या आपल्या नाट्य प्रवासाचा आढावा घेतला. विनय गावस यांनी नाट्य क्षेत्रात आलेले अनुभव कथन केले. नाट्यदिग्दर्शक गुरुदास सुतार व विजय नाईक यांनी

सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com