Valpoi : विवेकानंद ज्ञानमंदिरच्या मुलांनी लुटला वनभोजनाचा आनंद

परिसरात असलेल्या ‘बिरामणीचीराय’ या देवराईत मुलांना नेण्यात आले व देवराई या संकल्पनेची माहिती देण्यात आली.
A class of teachers with the Children of Vivekananda Gnanmandir who participated in the forest meal
A class of teachers with the Children of Vivekananda Gnanmandir who participated in the forest mealDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : केरी - सत्तरी येथील विवेकानंद ज्ञानमंदिराच्या मुलांचे वनभोजन वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी नुकतेच झाले. मुलांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याबरोबरच कैऱ्या, चुर्ना, पेरू, कोकम, बोंडूवर ताव मारत गिरी भ्रमण करून इथल्या निसर्ग श्रीमंतीचा अनुभव घेतला.

चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षा संपल्यामुळे मुलांना विरंगुळा मिळावा यासाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. परंतु केवळ भोजनापुरते मर्यादित न ठेवता मुलांना वाघेरीच्या परिसरात पदभ्रमण करण्यात आले. तसेच या परिसरात असलेल्या ‘बिरामणीचीराय’ या देवराईत मुलांना नेण्यात आले व देवराई या संकल्पनेची माहिती देण्यात आली. मुलांनी जंगल सैर करण्याबरोबरच रानमेव्यावरही ताव मारला.

A class of teachers with the Children of Vivekananda Gnanmandir who participated in the forest meal
Mahalasa Narayani Temple : ‘महालसा नारायणी’चा उद्यापासून जत्रोत्‍सव; अखंड नामस्मरण

सोबतच मुलांनी इथल्या गणपती विसर्जन स्थळाची साफसफाई केली. यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गोपीनाथ गावस यांनी सहभागी मुलांना माडाच्या झावळ्यांचे ‘मरल’ विणून दाखवले. वन भोजनानिमित्त खास फणसाची भाजी (शाक) बनवली होती, तसेच ताज्या कच्च्या कैरीचे लोणचे बनवले होते. दुपारी परतत असताना मुलांनी कळटी नदीत आंघोळ केली. मनोरंजन आणि प्रबोधन करीत हे वनभोजन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com