Valpoi News : डोंगुर्लीतील रस्ता डांबरीकरणाला मंजुरी: आमदार दिव्या राणे

Valpoi News : 3.74 कोटी खर्चाची तरतूद
MLA Deviya Rane
MLA Deviya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News : वाळपई, ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ३ कोटी ७४ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिली आहे.

ठाणे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या रस्त्याची वाताहत झाली होती. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.

यासाठी सातत्याने आमदार डॉ. दिव्या राणे यांनी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. त्यामुळे आता ठाणे पंचायत क्षेत्रातील पाली, चरावणे, हिवरे, नानेली, गोळावली, रिवे डोंगुर्ली या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात होणार आहे.

MLA Deviya Rane
Goa Politics: एक्झिट पोलचे अंदाज ठरले खोटे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ठाणे सरपंच सरिता गावकर म्हणाल्या, ठाणे पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने आता सर्व रस्ते चकाचक होणार आहे. यापूर्वी वाळपई ते ठाणेपर्यंत मुख्य रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अंतर्गत भागातील रस्ते करण्यात आले नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com