Valpoi News : वाळपई विद्यालयाच्या मैदानावरील पाण्याचा प्रशासकीय वर्गाकडून निचरा ; ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल

Valpoi News : यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वाळपई उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पावसाचे पाणी साचून तळे झाले होते.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पावसाचे पाणी साचून तळे झाल्याचे वृत्त सोमवारी (ता.१०) ‘दै. गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध होताच. याची तातडीने दखल घेत प्रशासकीय वर्गाने घेऊन सोमवारी सकाळपासूनच मैदानावर साचलेले पाणी वाहून जाण्याची सोय केली असून यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वाळपई उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पावसाचे पाणी साचून तळे झाले होते. त्यामुळे उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, सरकारी प्राथमिक शाळेतील मुले व वाळपई भागातील मुलांना खेळण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. तसेच अशाच प्रकारे जर पाऊस पडत राहिला तर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता होती.

Valpoi
Goa Loksabha Result 2024 : लोकसभा निकालावरून काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन

जेसीबी’च्या साहाय्याने काम

याबाबतचे वृत्त ‘दै. गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याची दखल घेऊन सोमवारी सकाळपासून पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. मैदानावर साचलेला कचरा व इतर वस्तू येथुन हटविण्यात आल्या आहेत. जेसीबीच्या साहाय्याने हे सर्व काम करण्यात आल्याने साचलेल्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वांनी ‘गोमन्तक’चे आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com