Vagator Drugs Seized: वागातोर येथे 15 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त; ब्रिटिश नागरिकाला अटक

गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा
Vagator Drugs Seized:
Vagator Drugs Seized: Dainik Gomantak

Vagator Drugs Seized: गोव्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू आहे. यात देश-विदेशातील पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान, गोव्यात या काळात अनेक ठिकाणी अमली पदार्थ सापडल्याच्याही घटना घडत असतात. आताही अशी एक घटना समोर आली आहे.

मंगळवारी, वागातोर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५ लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हा छापा टाकला. या धाडीवेळी पोलिसांनी एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली आहे.

जॉन पार्किन्सन (वय ५२) असे त्याचे नाव आहे. सध्या तो आसगाव येथे वास्तव्यास होता.

Vagator Drugs Seized:
Goa Beach Erosion: गोव्याच्या बीचसाठी धोक्याची घंटा! राज्यातील 21 समुद्रकिनाऱ्यांची मोठी धूप

त्याच्याकडूनच हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जॉन याने अमली पदार्थाच्या देवाणघेवाणीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल (एमएच ०४ एचडब्ल्यू ८५४६) देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

त्याच्याकडून एलएसडी पेपर १.१९४ ग्रॅम, आणि एलएसडी मिळून सुमारे १५ लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

जॉन पार्किन्सन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com