पणजी: स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळी पणजीतील महालक्ष्मी मंदीरात नमन करून आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे आणि भाजपकडून आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचे सांगितले आहे. तसेच आपण लोकांसाठी खूप काम केले असून, वेळेप्रसंगी योग्य ते निर्णय देखील घेतले आहेत, माझे वडील मनोहर परिकर यांना कधीच सहजपणे कोणती गोष्ट मिळाली नव्हती त्यामुळे मलाही त्यांच्यासारखाच संघर्ष व कष्ट करावा लागेल असे उत्पल म्हणाले आहे. मात्र अद्यापतरी भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला दुजोरा दिलेला नाही.
पणजी मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे असे मी यापूर्वीच भाजप पक्षाला सांगितले आहे. त्यामुळे मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित. गोवाभर भाईबद्दल काहीतरी असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यांच्या रूपात मला ही निवडणूक लढविण्यास ताकद मिळेल. मी भाजपा मध्ये राहूनच हे काम करणार आहे. लोकांचे जे मत असेल ते व तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जाईल.
मनोहर पर्रीकर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी पोटनिवडणूक लढवतील अशी अपेक्षा पर्रीकर समर्थकांनी व्यक्त केली होती. मात्र, भाजपने उत्पल पर्रीकर यांना राजकीय अनुभव नसल्याचे कारण देत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि आज वाढदिनी मीच पणजीतून निवडणूक लढणार असे म्हणत उत्पल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
पणजी मतदारसंघ हा गेली पंचवीस वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे या मतदारसंघातून मनोहर पर्रीकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येत होते त्यासंदर्भात उत्पल पर्रीकर यांना विचारले असता ते म्हणाले की मी माझा निर्णय भाजप पक्षाला सांगितला आहे व पार्टी तो निर्णय घेईल असा मला ठाम विश्वास आहे आम आदमी पक्ष मनोहर पर्रीकर यांचे व्हिजन पुढे नेणार आहेत त्या संदर्भात उत्पल यांना विचारले असता ते म्हणाले की मी यासंदर्भात काही बोलू इच्छित नाही.
उत्पल पर्रीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते तसेच भाजप पक्षाचे कार्यकर्ते आज सकाळी पणजीतील महालक्ष्मी देवस्थानात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.