Utpal Parrikar : मोन्सेरात यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे : उत्पल पर्रीकर

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात पर्रीकर यांचे भाष्य
Utpal Parrikar
Utpal ParrikarDainik Gomantak

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे, अशी मागणी पणजी शहरावर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या रूपाने ओढवलेल्या संकटावर भाष्य करताना उत्पल पर्रीकर यांनी आज ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात बोलताना केले.

‘मी वाट पहातोय पणजीत काही घडण्याची’ असे त्यांनी (मोन्सेरात) वक्तव्य केले आहे. ते नुसते पहात बसणार असतील, तर त्यांनी घरी बसावे. स्वस्थ बसून पाहणार असतील तर आमदारकीचाही त्यांनी राजीनामा द्यावा. 15 ट्रक रस्त्यावर अडकून रूतेतोपर्यंत ते स्वस्थ बसणार काय?’ असा सवाल उत्पल यांनी केला.

Utpal Parrikar
Leopard In Borim : बिबट्यासह तीन बछडे आढळल्याने घबराट; बोरी येथील प्रकार

मुख्यमंत्र्यांनी केवळ एका महिन्यापूर्वी पणजीत लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी दोन वर्षे बाबूश मोन्सेरात यांना भाजप सरकारने पणजी आंदण दिल्यासारखी स्थिती होती. मोन्सेरात करेल ती पणजीत पूर्व दिशा ठरत होती, असे विचारता उत्पल म्हणाले : असे का घडत होते, हे भाजप नेतृत्वालाच तुम्हाला विचारावे लागेल. याच मुद्यावर मी पणजीची निवडणूक लढविली आहे. बाबूश मोन्सेरात यांच्यासारखा उमेदवार तुम्ही पणजीवर कसा लादला?

उत्पल म्हणाले, निवडणुकीवेळी बाहेरून आलेल्या दबावांचीही मी पर्वा केली नाही. माझे वडील मनोहर पर्रीकर यांनी ज्या पक्षात ३० वर्षे घालविली, तेथे असे व्हायला लागले. (मोन्सेरात यांना पणजीचे उमेदवार बनविले.) त्याच्या पुढे जाऊन, लोटांगण घालून पक्षश्रेष्ठींपुढे असा आभास निर्माण करण्यात आला की, त्यांचेच पणजीवर प्राबल्य आहे.

त्यामुळे मला निवडणूक रिंगणात उडी घेऊनच दाखवावे लागले की, त्यांच्याकडे ‘कमळ’ निशाणी होती, म्हणूनच ते पणजीत जिंकून येऊ शकले; परंतु पणजीचे सर्व कार्यकर्ते आणि बहुसंख्य मतदार माझ्या मागे होते. भाजपचे चिन्ह मिळाल्यामुळे बाबूशचा राजकीय फायदा झाला असेल; परंतु पणजीवासीयांचे मात्र हाल झाले!

Utpal Parrikar
Rane VS Kamat : नगरनियोजन मंत्र्यांनी दिगंबरनाही ललकारले; नवे राजकीय संकट

‘त्या’ आरोपांची चौकशी करा!

‘मनोहर पर्रीकर यांनी आपल्या सरकारचे बलिदान दिले; कारण बाबूश यांनी चूक केली होती. त्यांना मंत्रिमंडळातून काढले, तेव्हा भाजप सरकार पुन्हा अधिकारावर येऊ शकेल काय, याची शाश्‍वती नव्हती. परंतु त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.

आताही ते पणजीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, असे म्हणतात. म्हणून त्यांना डच्चू देण्याची गरज आहे. त्यांनी नोकर भरतीतही भ्रष्टाचार झाला, असा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या आरोपांची एक तर चौकशी केली पाहिजे किंवा त्यांना काढून टाकायला हवे, असे उत्पल म्हणाले.

...अन् तेच घडतेय

उत्पल म्हणाले की, ‘तुम्ही माझ्या त्यावेळच्या मुलाखती काढून पहा, पणजीच्या राजकारणाचे अवमूल्यन होतेय, हे मी ठासून सांगत होतो व जी भीती मी व्यक्त करत होतो, तेच आता पणजीत घडताना दिसतेय. खोटेपणाचा आधार घेणे, नोकऱ्यांचे आमिष, पणजीच्या उन्नतीच्या बढाया, कॅसिनो हटविण्याचा शब्द देणे, पणजीत त्यांना उमेदवारी देणे, जिंकून आणणे ही चूक होती. आज जे काय चालले आहे, तो त्या चुकीचा परिणाम आहे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com