Usgaon Market: उसगावातील पीडीए मार्केट कोसळणार?

Usgaon Market: छत खराब : संबंधितांचे धोकादायक इमारतीकडे तीस वर्षांपासून दुर्लक्ष
usgaon Market
usgaon MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Usgaon Market: उसगावातील पीडीए मार्केटची दुर्दशा झाली असून धोकादायक स्थितीत असलेले हे मार्केट संकुल कोसळण्याच्या मार्गावर आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण पंधरा दिवसांपूर्वी या मार्केट इमारतीतील एका हॉटेलचा छताचा भला मोठा तुकडा कोसळल्याने हॉटेल मालक बचावला होता.

गेली तीस वर्षे सरकारकडून अतिशय दुर्लक्ष झाल्याने या पीडीए मार्केटची ही स्थिती झाली असून स्थानिक आमदार तथा राज्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून तिस्क परिसरातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

तीस वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांनी या पीडीए मार्केटची उभारणी केली होती. या पीडीए मार्केटमुळे तिस्क - उसगाव, पाळी तसेच धारबांदोडा व मोलेपर्यंतच्या लोकांची बाजाराच्या दृष्टीने चांगली व्यवस्था झाली होती.

पण नंतरच्या काळात या इमारतीकडे सरकारी यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाल्याने ही इमारत सध्या कोसळण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीत छत्तीस दुकाने असलेल्या या इमारतीत आता अर्धीच दुकाने कार्यरत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना बाजारहाटासाठी फोंड्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

पाळी, उसगाव, धारबांदोडा तसेच खांडेपारच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तिस्क भागात या मार्केटमुळे चांगली सोय झाली होती, पण आता हे मार्केट संकुलच धोकादायक स्थितीत असल्याने या ठिकाणी बाजारहाटासाठी येणाऱ्या लोकांना मनात धाकधूक घेऊनच फिरावे लागते.

त्यातच बहुतांश दुकाने बंद असून मार्केट संकुलाच्या आतील पॅसेजमध्ये विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने ग्राहकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागतो. या पीडीएच्या इमारतीकडे सरकारी यंत्रणेने त्वरित लक्ष देऊन एकतरी या इमारतीची पूर्ण दुरुस्ती करावी,

अन्यथा ही इमारत पाडून नवीन मार्केट संकुलाची उभारणी करावी, अशी मागणी येथील विक्रेते तसेच ग्राहकांकडून केली जात आहे.

मार्केट संकुल तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांनी बांधले होते, पण नंतरच्या काळात या मार्केट संकुलाकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले. रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघातून उसगाव - गांजे पंचायत बाहेर काढल्यानंतर आता या भागाचा विकास करण्याची सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची आहे.

usgaon Market
Goa Christmas: बाजारपेठ झगमगली; सासष्टीत नाताळची लगबग सुरु..

हॉटेलमालक बचावला...

पंधरा दिवसांपूर्वी या मार्केट संकुलात कार्यरत असलेल्या सुरेश नाईक यांच्या हॉटेलच्या छतावरील भला मोठा सिमेंट काँक्रिटचा तुकडा अचानक खाली कोसळला. पहाटेच्या वेळी सुरेश नाईक हे हॉटेलमध्ये बसून स्वयंपाकाची तयारी करीत होते.

काँक्रिटचा तुकडा खाली पडल्याने ते घाबरले. छताचा तुकडा डोक्यावर पडला असता तर मोठा गंभीर अपघात ठरला असता, आपण केवळ दैव बलवत्तर म्हणूनच वाचलो, अशी प्रतिक्रिया सुरेश नाईक यांनी दिली.

सभागृह कुचकामी ठरले

या मार्केट संकुलाच्या इमारतीवर पहिल्या मजल्यावर सभागृह बांधण्यात आले आहे, पण इमारतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याने या सभागृहाचीही दुर्दशा झाली आहे. छतावरून पाणी थेट सभागृहात गळत असल्याने हे छतही धोकादायक ठरले आहे. एक काळ या ठिकाणी चांगले कार्यक्रम व्हायचे, पण आता सभागृहच धोकादायक स्थितीत असल्याने हे कार्यक्रमही बंदच पडले आहेत.

तिस्क - उसगाव परिसराचा खरे म्हणजे रवी नाईक यांच्यामुळेच विकास झाला. पण नंतरच्या काळात तिस्क - उसगाव परिसराकडे सरकारने साफ दुर्लक्ष केल्याने या भागाला सध्या कुणी वालीच राहिलेला नाही.- प्रकाश नाईक (रहिवासी, तिस्क - उसगाव)

खरे म्हणजे तिस्क - उसगाव हे आमच्यासाठी बाजारहाटाचे मोठे ठिकाण होते, पण मार्केट संकुलाची स्थिती अतिशय दयनीय झाल्याने त्यातील दुकानांची वाट लागली आहे. या ठिकाणी ग्राहकांना कोणत्याच सुविधा नाही, त्यामुळे बाजारहाटासाठी येणाऱ्यांना अतिशय अडचणीचे ठरत आहे.- जयराम गावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com