Goa: गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून...

गोव्यातील (Goa) गांजे उसगावला (usgaon-Ganje) पूराचा (Flood) जोरदार फटका बसला आहे.
usgaon-Ganje village was damaged due to floods
usgaon-Ganje village was damaged due to floodsDainik Gomantak

गुळेली: गोव्यातील काही तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या पूराने गांजे उसगावला भागाला बराच मोठा तडाखा दिला यात अनेक घरात तर पाणी शिरले पण दुःखद बात म्हणजे या ठिकाणी चार घरे जमिनदोस्त होऊन होत्याचे नव्हते झाले. (Usgaon-Ganje village in goa was damaged due to floods)

गुरुवार 22पासून म्हादई नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती संध्याकाळी पाच दरम्यान वाळपई फोंडा रस्ता पाण्याखाली गेला शुक्रवार 23 रोजी पहाटे दरम्यान गांजे येथील घरात पाणी शिरायला सुरुवात झाली सहा सात दरम्यान संपूर्ण भाग पाण्याने व्यापला पाण्याचा जोर मोठा असल्यामुळे या भागातील घरे कोसळली असल्याचे मत येथील नागरीक व्यक्त करीत आहेत.

या पूरामुळे फडते, नाईक, गावकर,भर्तू आदीची घरे कोसळली आहेत.या पूर्वी अशा प्रकारचा पूर 1923-24साली आला होता. तद्नंतर 1981-82 आणि आता 2021साली आला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहेत.

या पुराची तीव्रता एवढी होती की गांजे येथे वीजेच्या खांबावर तारांजवळ वाहून आलेली एक खुर्ची स्थिरावली होती त्यामुळे पाणी किती प्रमाणात भरुन वाहत होते याचा अंदाज येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com