Usgao Water Crisis: 'आम्हाला दोन तास तरी पाणी द्या'; उसगावात पाणी प्रश्न पेटला! महिलांनी काढला घागर मोर्चा

Women Protest For Water In Usgao: आज आम्हाला संबंधित कार्यालयावर घागर मोर्चा घेऊन येण्याची वेळ आली. आत्ता तरी संबंधित खाते आणि सरकाराला जाग येईल का? हे पहावे लागणार आहे.
Women Protest For Water In Usgao
Women Protest For Water In UsgaoDainik Gomantak
Published on
Updated on

Usgao Vadbag Water Shortage Women Protest Public Water Office

फोंडा: उसगाव-वडबाग येथे अनेक दिवसांपासून पाण्याची कमतरता असल्याने येथील स्थानिक महिलांनी पंच मनीषा उसगावकर यांना बरोबर घेऊन सार्वजनिक पाणीपुरवठा कार्यालयावर आज (10 मार्च) घागर मोर्चा नेऊन येथील अधिकारी सराफ यांना जाब विचारला. तेव्हा समस्या सोडवण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

उसगावात पाणी प्रश्न पेटला

पंच मनीषा उसगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक दिवसांपासून वार्ड नंबर 4, वडबाग, माटो तसेच इतर ठिकाणी पाण्याची (Water) कमतरता आहे. या संदर्भात आपण महिलांना बरोबर घेऊन अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घातले, तरीसुद्धा संबंधित अधिकारी पूर्ण गतीने पाणी देण्यास अपयशी ठरले. म्हणून आज आम्हाला संबंधित कार्यालयावर घागर मोर्चा घेऊन येण्याची वेळ आली. आत्ता तरी संबंधित खाते आणि सरकाराला जाग येईल का? हे पहावे लागणार आहे.

Women Protest For Water In Usgao
Water Crisis at Ganjem-Usgao: गांजे-उसगावात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

बेतोडा-कासरवाड्यातही पाण्याची कमतरता

बेतोडा-कासरवाडा येथेही पाण्याची कमतरता असल्याने तेथील लोकांनीही सार्वजनिक पाणी विभागचे अधिकारी सराफ यांची भेट घेतली आणि आम्हाला पाणी पुरवावे असे सांगितले. या संदर्भात संबंधित अधिकारी सराफ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पाणी का येत नाही, याचा तपास करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला सांगितले आहे. वडबागात आपण तातडीने एक पाण्याचा टॅंकर पाठवणार असल्याने निदान आज तरी त्यांना पाणी मिळेल. आपण स्वतः कनिष्ठ अभियंत्याला घेऊन त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे.

Women Protest For Water In Usgao
Goa Water Crisis: 'तिळारी'साठी हजारो कोटी खर्चून गोव्याच्या घशाला कोरडच! पाणीप्रश्न आणि ‘गरिबाने आधी होडीत चढावे’ मानसिकता

दोन तास पाणी द्या, आम्हाला पूर्ण वेळ पाणी नको

दिवसांतून दोन तास पाणी द्यावे, सध्या किंचित घरात पाणी पोहोचते, तेही मंद गतीने आहे. त्यामुळे प्रशासनाने आमची समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com