Electric Pole: म्हारवासडात कललेला वीजखांब धोकादायक; खांब कोसळल्यास मोठा अनर्थ!

Electric Pole: उसगाववासीयांकडून कललेला खांब व्यवस्थित उभारावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
Electric Pole
Electric PoleDainik Gomantak
Published on
Updated on

Electric Pole: म्हारवासडा-उसगाव येथे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच वीजखांब धोकादायक स्थितीत असल्याने हा खांब कधीही कोसळून पडू शकतो. हा वीज खांब कोसळल्यास मोठा अनर्थ घडणार असून संबंधित वीज खात्याने वेळीच हा कललेला खांब व्यवस्थित उभारावा, अशी मागणी उसगाववासीयांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या कललेल्या वीज खांबावरून वीजवाहिन्या नेल्यामुळे तो अधिकच धोकादायक बनला आहे. उसगाव ते म्हारवासडा-खांडेपार या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या रस्त्याच्या कडेची झुडपेही कापलेली नाहीत. त्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन चटकन नजरेस पडत नसल्याने अपघात होत आहेत.

म्हारवासडा येथील हा कललेला वीजखांब अगोदर व्यवस्थित उभारा आणि संभाव्य धोका टाळा, असे आवाहन वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, म्हारवासडा ते पार-खांडेपार रस्त्यावर या दिवसांत बरेच अपघात झाले असून त्यातील काही जीवघेणे ठरले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतूकयोग्य करताना आवश्‍यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याची आवश्‍यकता आहे.

Electric Pole
Goa : सरकारी कागदपत्रे होणार डिजीटल; दस्ताऐवज ई-मेल करता येणार

लोखंडी कठडा पूर्ववत करा

चार महिन्यांपूर्वी नवीन खांडेपार पुलाच्या जोडरस्त्यावरील लोखंडी संरक्षक कठडा तुटून एक अवजड ट्रक खाली पडला आहे. हा संरक्षक कठडा तसाच रस्त्याच्या कडेला टाकलेला असल्याने इतर वाहनांना धोका निर्माण झाला आहे. हा तुटलेला लोखंडी कठडा पूर्ववत रस्त्याच्या कडेला उभारा, अशीही मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com