Bicholim: पेपर स्प्रे प्रकरण! शिक्षण खात्याची शाळेला कारणे दाखवा नोटीस; तीन दिवसात उत्तर द्या

मुलांनीच वर्गात पेपर स्प्रे मारल्याचे तपासात समोर आले
pepper spray Used In school Bicholim
pepper spray Used In school BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

Pepper Spray Used At A Higher Secondary In Bicholim: येथील शांतादुर्गा उच्‍च माध्‍यमिक विद्यालयात अकरावीच्‍या वर्गातील 11 विद्यार्थिनींना आज दुपारी 12च्‍या सुमारास अचानक श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्‍याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

वर्गात ‘पेपर स्प्रे’चा वापर झाल्‍याने हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला होता. मुलांनीच वर्गात पेपर स्प्रे मारल्याचे तपासात समोर आले असून, त्या चार विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. 

दरम्यान, 11 विद्यार्थिनींना तत्‍काळ डिचोली आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आले. परंतु त्‍यातील 10 जणींची प्रकृती गंभीर वाटल्‍याने त्‍यांना म्‍हापसा येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात नेण्‍यात आले.

pepper spray Used In school Bicholim
Bicholim: अकरावीच्या वर्गात मुलांनी मारला स्प्रे, 11 विद्यार्थिनींना श्वासोच्छवासाचा त्रास; पोलिसांसमोर पेच

या प्रकरणी गोवा शिक्षण विभागाचे संचालक शैलेश झिंगडे यांनी शांतादुर्गा उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या नोटिसेला 3 दिवसांत पूर्ण तपशीलासह उत्तर देण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

"आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयात घटना घडल्यामुळे सुमारे 11 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे वृत्तपत्रांतून सांगण्यात आले आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत अशा घटना घडणे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शैक्षणिक व्यवस्थेसाठीही हानिकारक आहे."

"शाळेच्या परिसरात अशा घटना रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल शाळा व्यवस्थापनावर कारवाई का केली जाऊ नये? याची कारणे दाखविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. ही नोटीस जारी केल्यापासून 3 दिवसांच्या आत घटनेच्या तपशीलवार अहवालासह या नोटीसला उत्तर द्या" असे जारी केलेल्या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Show Casue Notice
Show Casue Notice

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com