जमिनीसाठी शासकीय संकेतस्थळाचा वापर

विक्रांत शेट्टीचा कारनामा : मित्रांच्या आईवडिलांच्या नावे करायचा नोंदी
Goa Illegal Land Grabbing
Goa Illegal Land GrabbingDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा ता. २४ (प्रतिनिधी) ः संशयित विक्रम शेट्टी व त्याच्या टोळीने सरकारी संकेतस्थळावरुन मालमत्ता व पीडित मालकांची ओळख पटविल्या. त्यानंतर या मालमत्ता संशयित विक्रांत बनावट कागदपत्रांद्वारे आपल्या मित्रांच्या आईवडिलांच्या नावे करून नंतर हेच दस्तऐवज पुरातत्त्व विभाग व सब रजिस्टारमध्ये नोंदणी करायचा. ज्यातून, कायदेशीर कागदपत्र मिळवून याच मालमत्ता नंतर खरेदीदारांना विकायचा अशी माहिती सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात दिली.

गोव्यातील कोट्यवधींच्या जमीन हडप घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या संशयित विक्रांत शेट्टी याला शुक्रवारी म्हापशातील जीएमएफसी न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर केला. म्हापसा न्यायालयात एसआयटीकडून सरकारी वकीलांनी युक्तिवाद केला की, संशयित विक्रांत शेट्टीला गंभीर गुन्ह्यात अटक झाली आहे.

विक्रांतने बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकादेशीरपणे मूळ मालकांच्या मालमत्ता आपल्या मित्रांसह त्यांच्या आईवडिलांच्या नावावर परस्पर केल्या. तसेच संशयित विक्रांतने आपले मित्र हेच या जमिनींचे वारसदार असल्याचे दाखविले आहेत. संशयित व त्याचे साथीदार हे बेकायदा काम पद्धतशीरपणे व्यावसायिकरित्या करायचे. काहीवेळा बनावट पोर्तुगीज कागदपत्रांचा यासाठी वापर केला होता. नंतर या मालमत्ता विकत, खरेदीदारांकडून संशयित विक्रांत व त्याच्या मित्रांनी हे पैसे स्वतःच्या बँक खात्याकडून जमा करून ते काढल्याचे तपासावेळी आढळले आहे.

या बेकायदा कृत्यामुळे अनेक निष्पाप गोमंतकीय लोक या जमीन हडप घोटाळ्याच्या टोळीचे बळी पडले आहेत. या टोळीने पुरातत्त्व व सब रजिस्टार कार्यालयाच्या माध्यमातून घुसखोरी करीत हा डाव साधल्याचे सरकारी वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

1943 सालचे सेल डीड

एसआयटीने न्यायलयात सांगितले की, आसगावमधील सर्व्हे क्रमांक 33/3 मधील विक्रांत शेट्टी याने शासकीय अधिकारी व इतरांच्या सहाय्याने कट रचत बेकायदा 1943सालातील सेल डीड तयार केले. मुळात ही मालमत्ता तक्रारदाराच्या ताब्यात आहे. तक्रारदाराने ही मालमत्ता कधीच कुणा तिसऱ्या व्यक्तीला विकली नव्हती आणि याच मालमत्तेचा नंतर विक्री करार संशयित विक्रात शेट्टीने जुलै 2021मध्ये केला. बनावट दस्तऐवजच्या आधारांवर संशयित विक्रांतने ही मालमत्ता सुमारे 1 कोटी 12 लाखाला विकली.

बनावट दस्तऐवज

संशयित विक्रांत शेट्टीने तपासावेळी सांगितले की, जवळपास 70 मालमत्ता असलेली 1,48,825 चौरस मीटर जागा, ज्यांची किंमत सध्या बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी आहे. या मालमत्ता विक्रांतने इतर 15 सहकऱ्यांसोबत ‘त्या’ बनावट दस्तऐवजच्या नावाने बळकावल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com