येत्या दोन महिन्यात काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार - नजिर खान

काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला - नजिर खान
Nazir Khan
Nazir Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सर्व धर्म पाळणारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला असल्याची माहीती गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नजिर खान यांनी दिली आहे. राज्य काँग्रेस पक्षाने येथील अल्पसंख्याकाचा उपयोग फक्त विधानसभा निवडणूकीपूरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे मुस्किल असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देण्यात आला असल्याची माहीती नजिर खान यांनी दिली.

( Upcoming 2 months 8 Congress MLAs will join another party said Nazir Khan )

Nazir Khan
मोपा विमानतळाची कॅलिब्रेशन चाचणी सुरू

वास्को बायणा येथील आपल्या कार्यालयात माहीती अध्यक्ष नजिर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी येणाऱ्या दोन महीन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान,एलविनो अरावजो,बर्नाद फर्नाडीस उपस्थित होते.

पुढे माहीती देताना नजिर खान म्हणाले कि, गोवा प्रदेश काँग्रेस समितीने येथील जनतेचा विश्वास गमावला असून असल्या स्वार्थी पक्षावर यापुढे साथ देणे कठीण असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्ली अखिल भारतीय कॉंग्रेस अल्पसंख्याक कार्यालयात तर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा पणजी येथील काँग्रेसच्या कार्यालयात देण्यात आल्याची माहीती नजिर खान यांनी दिली आहे.

Nazir Khan
गोव्यात ॲप आधारित टॅक्सी सेवेला हिरवा कंदील

राज्यातील जनतेने अकरा काँग्रेसचे आमदार निवडून दिले असताना सुध्दा पक्षातील आठ आमदार स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खुलासा देखिल खान त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचणार आहे. याला पुर्णपणे गोवा प्रदेश काँग्रेस जबाबदार असणार तसेच अध्यक्ष अमित पाटकर, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर नेते. गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याने आपल्या स्वार्थासाठी, या पक्षाचा फक्त आर्थिकरित्या उपयोग केला असल्याने केंद्रीय पदाधिकाऱ्यानी येथील पक्षावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नजिर खान यांनी केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणूकीत गोव्यातील जनतेने काँग्रेस पक्षाचे अकरा आमदार निवडून देऊन सुध्दा हे आमदार स्वताच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहे. येत्या दोन महीन्यात आठ पेक्षा जास्त आमदार काँगेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहीती नजिर खान यांनी दिली. गोवा प्रदेश काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यातील अल्पसंख्याकाचा मतासाठी तेवढाच उपयोग करून आमच्यावर अन्याय केला आहे.

विद्यमान काँग्रेस अध्यक्ष पाटकर यांने काँग्रेस पक्षाला रसातळाला आणून ठेवले असल्याने केंद्रीय पक्ष श्रेष्ठीने त्वरीत गोव्यातील समिती बर्खास्त करावी अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष गोव्यात अकरा वरून एक अंकी संख्येवर येणार असल्याची माहीती शेवटी नजिर खान यांनी पत्रकार परिषदेतून केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com