Forced Conversion: धर्मांतरण रॅकेट! गोव्याच्या महिलेचे 'पाकिस्तान कनेक्शन' उघड; लष्कर-ए-तोयबा, PFIशी संबंध

Ayesha Goa conversion racket: मिळालेल्या माहितीनुसार, आयशा ही सांत आंद्रे येथे भाड्याच्या खोलीत राहात होती. तिला अटक झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे.
Ayesha Goa Forced Conversion Agra
Ayesha Goa conversion racketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे उघडकीस आलेल्या धर्मांतर रॅकेटमध्ये गोव्यातील महिला आयशा ऊर्फ एस.बी. कृष्णा ही फंड मॅनेजर असल्याचे समोर आले असून, उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे.

तिच्यासह एकूण १० जणांना विविध राज्यांतून अटक केली आहे. लष्कर-ए-तोयबा, पीएफआय, एसडीपीआय आणि पाकिस्तानातील कट्टरपंथी संघटनांशी या रॅकेटचे संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशा ही सांत आंद्रे येथे भाड्याच्या खोलीत राहात होती. तिला अटक झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. यासंदर्भात गोव्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, गोपनीयतेच्या कारणास्तव अधिक माहिती देणे त्यांनी टाळले.

या रॅकेटचा कारभार ‘आयएसआयएस’प्रमाणे चालत असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, अल्पवयीन मुलींचा ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात होते. मूळची ओडिशाची असलेली आणि गोव्यात राहणारी आयशा या रॅकेटमध्ये फंड मॅनेजर असल्याचे समोर आले आहे.

ती कथितपणे परदेशातून येणाऱ्या निधीचे व्यवस्थापन करत होती आणि विविध खात्यांमध्ये त्या रकमा पाठवण्याचे काम तिच्याकडे होते. तपासात उघड झाले आहे की, कॅनडामधील सैयद दाऊद अहमद याच्याकडून निधी गोव्यात आयशाच्या खात्यात येत होता. याच पैशांचा वापर धर्मांतर आणि ब्रेनवॉशसाठी केला जात होता.

आयशाचा कथित पती अली हसन ऊर्फ शेखर राय हा कोलकाता येथील न्यायालयात कर्मचारी असून, तो रॅकेटच्या कायदेशीर बाजू हाताळत होता. धर्मांतराच्या आधी कायदेशीर प्रक्रिया समजावून देण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. तपासादरम्यान आयशाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर आढळले असून त्यात ती एके-४७ रायफलसह उभी असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे.

थेट पाकिस्तानशी कनेक्शन उघड

उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक राजीव कृष्णा यांनी सांगितले की, या रॅकेटचे धागेदोरे पीएफआय, एसडीपीआय आणि थेट पाकिस्तानातील काही कट्टरपंथी संघटनांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या प्रकरणात एसटीएफ, एटीएससह इतर राज्यांतील आणि केंद्रीय तपास यंत्रणाही सामील झाल्या आहेत.

आणखी काहीजण आयशाच्या संपर्कात

तपास यंत्रणांकडून आयशाचे स्थानिक संबंध, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. आणखी कोणी गोमंतकीय यात सामील आहेत का, हे तपासात स्पष्ट होईल. धर्माच्या नावावर राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणाऱ्या या कटाचा गोव्याशी असलेला दुवा गंभीर असून, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Ayesha Goa Forced Conversion Agra
Forced Conversion: हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

या संशयितांच्या आवळल्या मुसक्या

१. आयशा (एस.बी. कृष्णा) (गोवा)

२. अली हसन ऊर्फ शेखर राय (कोलकाता)

३. ओसामा (कोलकाता)

४. अल रहमान कुरेशी (आग्रा)

५. अब्बू तालिब (मुजफ्फरनगर)

६. अबूर रहमान (देहरादून)

७. मोहम्मद अली (जयपूर)

८. जुनैद कुरेशी (जयपूर)

९. मुस्तफा ऊर्फ मनोज (दिल्ली)

१०. मोहम्मद इब्राहिम (रीत बनिक) (कोलकाता)

Ayesha Goa Forced Conversion Agra
Goa Religious Conversions: पाद्री आणि पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी गाईला मारून तळ्यात फेकले, तिथेच कुंकळ्ळीतील बंडाला सुरुवात झाली

...अशी होती धर्मांतराची पद्धत

या नेटवर्कचा सूत्रधार आग्राचा अल रहमान कुरेशी असून, तो सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींचा ब्रेनवॉश करत होता. कोलकात्याचा ओसामा, जयपूरचा मोहम्मद अली, दिल्लीचा मुस्तफा आणि इतर राज्यांतील सदस्यही सक्रिय होते. या रॅकेटचे टार्गेट हे प्रामुख्याने किशोरवयीन मुली होत्या. त्यांच्याभोवती हे जाळे रचले जात असे आणि नंतर त्यांचा ब्रेनवॉश केला जाई. कोणी प्रेमाच्या नावाने, तर कोणी आर्थिक मदतीच्या नावाने त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com