Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Pedne Crematorium Body: पेडणे नगरपालिकेच्या स्मशानभूमीत एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
Pedne Crematorium Body
Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: पेडणे नगरपालिकेच्या स्मशानभूमीत एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृत व्यक्ती एका पायाने विकलांग असून, उजव्या पायाचा गुडघ्याखालील भाग नसल्याचे आढळून आले. मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वी तेथे आणून ठेवला असावा, तसेच त्‍याचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, अंगावरील कपडे व राहणीमानावरून तो भिकारी असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठवला आहे.

Pedne Crematorium Body
Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

आज सकाळी एका कुटुंबातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी उघडली असता हा प्रकार उघडकीस आला. गेटला कुलूप असले तरी एका बाजूने निमुळती वाट असल्याने त्याच मार्गाने मृतदेह आणून ठेवला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर नगरपालिकेतर्फे पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. उपनिरीक्षक आदित्य गाड पुढील तपास करत आहेत.

Pedne Crematorium Body
Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

निमुळत्या वाटेने मृतदेह आणल्याची शक्यता

स्मशानभूमीच्या मुख्य गेटला कुलूप लावण्यात येते. मात्र, एका बाजूने आत प्रवेश करण्यासाठी निमुळती वाट असल्याचे समजते. याच वाटेचा वापर करून अज्ञात व्यक्तीने मृतदेह स्मशानभूमीत आणून ठेवला असावा, असा प्राथमिक संशय आहे. पोलिसांकडून या शक्यतेच्या अनुषंगानेही तपास करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com