Record of Excellence: डिचोलीतील महिलेची निराळी कला; ‘रेकॉर्ड्‌स ऑफ एक्सलन्स’ने सन्मानित

जिभेची पूर्णतः घडी घालण्याचा विक्रम
Record of Excellence
Record of Excellence

तुकाराम सावंत

इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि त्याच्या जोडीला परिश्रमाची साथ मिळाली, तर कोणत्याही अशक्यप्राय गोष्टीला गवसणी घालता येते. याची अनेक उदाहरणे समाजात अनुभवायला मिळतात. डिचोली तालुक्यातील निसर्गसंपन्न अशा ‘वन’ या गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने तर वेगळीच साधना प्राप्त करून विक्रमाची नोंद केली आहे.

Record of Excellence
परंपरांना छेद देत वडिलांच्या पश्‍चात मातेने केले कन्यादान! मुलीच्या इच्छेसाठी झुगारली समाजबंधने

या महिलेची कला म्हणजेच जिभेची घडी घालणे. कोणताही आधार न घेता ही महिला स्वतःच्या जिभेची घडी घालण्याची किमया करीत आहे. आश्चर्याची बाब म्हणजेच जिभेची घडी घालून ती चक्क ४२ मिनिटे त्याच अवस्थेत राहू शकते. ही आगळीवेगळी साधना प्राप्त करणाऱ्या महिलेचे नाव वेदा विराज भिडे असे आहे.

लग्नापूर्वी मूळ कर्नाटक राज्यातील होन्नावर तालुक्यातील असलेल्या वेदा भिडे हिचे पूर्वाश्रमीचे नाव हेमा असे आहे. वेदा भिडे यांच्या या आगळ्यावेगळ्या साधनेची म्हणजेच विक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्‌स या संस्थेने नोंद घेत त्यांना ‘वर्ल्ड रेकॉर्ड्‌स ऑफ एक्सलन्स’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही बहाल केला आहे.

दरम्यान, वेदा यांचे हे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. अनेकांकडून त्यांच्या या कलेचे कौतुक होत आहे.

स्त्री म्हटली की घर आणि संसार एवढ्यापुरतीच मर्यादित, असा अनेकांचा समज आहे. प्रत्येक महिलेच्या अंगात कोणती ना कोणती तरी कला असते. मात्र, सगळ्याच महिला आपले कलागुण पुढे आणतातच असे नाही. महिलांनी थोडा वेळ काढून आपल्या अंगातील कलागुण आणि कौशल्य विकसित करावे. कुटुंबातील मंडळींनीही त्यांना तेवढेच प्रोत्साहन द्यावे.

वेदा विराज भिडे

लहानपणापासूनच सराव

लहानपणापासूनच वेदा या जिभेची घडी घालण्याचा सराव करीत होत्या. आता त्या दात किंवा जबड्याला स्पर्श न करता अलगदपणे जिभेची घडी घालू शकतात. एवढेच नव्हे, तर त्या चक्क ४२ मिनिटे जीभ घडी घातलेल्या अवस्थेत ठेवू शकतात.

या कलेत आणखी प्रगती करण्याचा वेदा भिडे यांनी संकल्प केला आहे. वेदा यांना शिलाई आणि रांगोळी कलेचीही आवड आहे. हे करताना नवऱ्यासह सासू, सासरे आणि कुटुंबातील सर्वांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळत असल्याचे वेदा भिडे अभिमानाने सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com