Unique School Reunion: याला म्हणतात मैत्री, हैद्राबादमधील 1983 बॅचच्या विद्यार्थ्यांचे गोव्यात गेट टुगेदर

विशेष म्हणजे काहीतरी नवीन म्हणून सर्वांनी सफेद रंगाचा कूर्ता आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती.
Unique School Reunion
Unique School Reunion

Unique School Reunion: शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर दुनियादारीला सुरुवात होते. प्रत्येकजण स्वत:च्या आयुष्यात गुंतत जातो, नोकरी, कुटुंब यातून मित्रांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही.

अशावेळी शाळेतील दिवसांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी गेट टुगेदर नावाची संकल्पना अलिकडे फारच प्रसिद्ध झाली आहे. हैद्राबाद येथील एका 1983-84 बॅचच्या 16 मित्रांनी नुकतेच गोव्यात गेट टुगेदर करत शाळेतील आठवणी जागवल्या.

हैद्राबादमधील राजा जितेंद्र पब्लिक स्कूलमध्ये 1983-84 शिक्षण घेणारे हे सर्वजण कामानिमित्त देशात आणि विदेशात असतात. पण, मागील दहा वर्षापासून ते नियमित गेट टुगेदर करतात. यावर्षी सप्टेंबर 14 ते 16 त्यांनी गोव्यात एकत्र जमून कल्ला केला.

सोळा मित्रांनी गोव्यातील बीच, रेस्टॉरंट आणि पार्टीमध्ये सहभागी होऊन जल्लोष केला. यातील कोणी कामानिमित्त कॅनडा, दुबईत असतात तर, इतर देशात विविध ठिकाणी राहायला आहेत. पण, मित्रांना भेटायला म्हणून सर्वजण गोव्यात एकत्र आले.

विशेष म्हणजे काहीतरी नवीन म्हणून सर्वांनी सफेद रंगाचा कूर्ता आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती.

हे ते सोळा मित्र

अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. यू श्रीनिवास, एचएएल बेंगळुरूचे वेणू, म्हैसूरमधील माता अमृतानंदमयी विद्यापीठाचे डीन शेखर, दुबईचे मिस्बाह, व्यावसायिक अजमथ, क्रिकेटपटू आणि सायकलपटू आर मुरली आणि बन्सी नारायण सिंग.

बन्सी नारायण सिंग प्रतिष्ठित क्रिकेटर असून, ते शाळेच्या टीमचे कर्णधार देखील होते. या बॅचचे नेटवर्किंग देखील त्यांच्याकडेच आहे.

सर्वांनी तीन दिवस गोव्यात मौजमजा आणि पार्टी घालवले, त्यानंतर एकमेकांना पुष्पगुच्छ दिला तसेच, पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत निरोप घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com