वास्को: भारत देशाच्या सेवेला आम्ही प्रथम प्राधान्य देणार असून जनतेला चांगले प्रशासन देण्यासाठी गोवा पोलीस सदैव अग्रेसर राहणार आहे. महिलावर्गाला सेवा देताना त्याच्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खासगी संस्थेच्या सहकार्याने गोव्यात प्रथमच वास्को पोलीस स्थानकात (Vasco Police Station) आई आणि मुलांसाठी विशेष खोल्याचे लोकार्पण केले असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. इंद्रदेव शुक्ला यांनी दिली.
गोवा पोलिसांनी दक्षिण गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात रोटरी क्लब वास्को पोर्ट टाऊन यांच्या सहयोगाने आई आणि बाळाच्या खोल्याच्या लोकार्पणाबरोबर चार अतिथीगृह खोल्याचे उद्घाघाटन प्रमुख पाहुणे पोलीस महासंचालक डॉ. इंद्रदेव शुक्ला, पोलीस उप महानिरीक्षक परम दित्य पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया, पोलीस अधीक्षक निदीन वालसन, दक्षिण गोवा वाहतुक पोलिस अधिक्षक धर्मेश आंगले, मुरगाव पोलीस उपअधीक्षक शेख सलीम, उपअधीक्षक सुदेश नार्वेकर, उपअधिक्षक निलेश राणे, वास्को पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, मुरगाव पोलीस निरीक्षक अजित उम्रे, पोलीस निरीक्षक उदय गावडे, वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, रोटरी क्लब वास्को पोर्ट टाऊन अध्यक्ष कविता दहलानिया,युवा उद्योजक नितीन बांदेकर, निखिल लवांदे, समीर पालेदार, राधा लवंदे, पल्लवी सरमलकर, सुप्रिया वेरेकर, नंदिनी शेट्टी, अदित्य साळकर, गौतम खरंगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस महासंचालक डॉ.शुक्ला म्हणाले की महिला व मुलावर होणारे अन्याय पूर्णपणे बंद करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.यासाठी लवकरच राज्यातील इतर पोलिस स्थानकात आई आणि बाळासाठी खोल्या तयार करण्यात येईल. तसेच गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील पोलीस स्थानकात सुद्धा आई व बाळासाठी खोल्या उपलब्ध करणार अशी माहिती पोलिस महासंचालक डॉ. शुक्ला यांनी दिली.
वास्को शहरात वाढत्या वाहतुकीवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी वेर्णा ते वरूणापुरी मांगोरहील, बायणा, मुरगाव -सडा महामार्गाचा उपयोग वरील अवजड वाहनांसाठी केला जाईल अशी माहिती डॉ. शुक्ला यांनी दिली. तसेच वास्को शहरातील दोन्ही रस्त्यावर होत असलेली पार्किंग समस्या सोडविण्यात लवकरच निर्णय घेण्यात येईल. संपूर्ण वास्को शहरात खासगी व्यवस्थापनाच्या सहकार्याने बरोबर सामाजिक बांधिलकी जबाबदारी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याचा कंट्रोलरूम वास्को पोलीस स्थानकात असणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक डॉ. शुक्ला यांनी दिली. सदर कार्यक्रमात रोटरी क्लब अध्यक्ष कविता दहलानिया यांचे भाषण झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपअधिक्षक निलेश राणे तर आभार प्रदर्शन उपअधीक्षक शेख सलीम यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.