Amit Shah : गोव्यासह 19 राज्यांना केंद्र सरकारचा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली मंजूरी
Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit ShahDainik Gomantak

State Disaster Response Fund : गोव्यासह एकूण 19 राज्य सरकारांना केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी जाहीर केला आहे. याबाबतची मंजुरी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिली. त्यानुसार 19 राज्य सरकारांना 6,194.40 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

दरम्यान, हा निधी वितरित केल्यामुळे राज्यांना चालू पावसाळी हंगामात उपाययोजना करण्यात मदत होईल असे गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Union Home Minister Amit Shah
Pernem Excise Scam : पेडणे अबकारी खात्यातील घोट्याळ्याप्रकरणी तक्रार दाखल

2022-23 या वर्षासाठी छत्तीसगड, मेघालय, तेलंगणा, उत्तर प्रदेश या चार राज्यांकरिता 1,209.60 कोटी रुपये दिले जातील. तर आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा, मेघालय या 15 राज्यांकरिता वर्ष 2023-24 साठी 4,984.80 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

2023-24 या वर्षात 9 राज्यांना एसडीआरएफमध्ये केंद्रीय वाटा म्हणून 3649.40 कोटी रुपये देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे.  केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे वर्ष  2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एसडीआरएफकरिता 1,28,122.40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com