

पणजी : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे गोव्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास करण्यासाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. गोव्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद, अशा आशयाचं ट्विट करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांचे आभार मानले आहेत.
गोव्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात विकास करण्याची प्रचंड क्षमता आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार गोव्याला सर्वतोपरी मदत करत असल्याचं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. काही दिवसांपूर्वी गोवा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मत्स्योद्योग, दुग्धोत्पादन, पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह यांनी गोवा सरकारला केंद्रीय योजनांची भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती, या बैठकीत राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्य सरकारकडून केंद्रीय मदतीसाठीचा आराखडा सादर करण्यात आला तो आराखडा विचारात घेऊन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी सरकारला शक्य ती सर्व मदत करू असे आश्वासन दिले होते. गोवा सरकारने केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेसारखीच स्वयंपूर्ण गोवा योजना जारी केली आहे. त्यासाठी कृषी, मत्स्य, दूध आणि भाजीपाल्याच्या क्षेत्रात गोव्याला इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागू नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून ही मदत मागण्यात आली होती. गोवा सरकारच्या यंदाचा अर्थसंकल्प स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेवर असणार आहे त्या अर्थसंकल्पात या केंद्रीय या केंद्रीय मदतीचा उल्लेख असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.