उलारिको रॉड्रीगीस यांनी वास्को काँग्रेसच्या गटाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

उलारिको राॅड्रीक्स (Ularico Rodriguez) हे काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते असून त्याने 1984 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Ularico Rodriguez
Ularico RodriguezDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: वास्को काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी सरचिटणीस तसेच विद्यमान वास्को काँग्रेसचे (Congress) गटाध्यक्ष उलारिको रॉड्रीगीस (Ularico Rodriguez) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे वास्को काँग्रेस मध्ये खळबळ माजली आहे.

उलारिको राॅड्रीक्स हे काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते असून त्याने 1984 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसमध्ये त्याने सरचिटणीस तसेच इतर पदावर आरूढ होऊन कॉंग्रेसचे कार्य पुढे नेले. याव्यतिरिक्त त्याने काँग्रेसच्या बळावर मुरगाव नगरपालिकेच्या (Murgaon Municipality) नगराध्यक्षपदी 2004 मध्ये आरूढ झाले. काही महिने नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांचा पायउतार करण्यात आला.

Ularico Rodriguez
Goa Election: काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची युती जाहीर

तर 10 सप्टेंबर 2019 रोजी त्याची वास्को काँग्रेस गटाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या काळात त्यांनी अनेक आजी-माजी काँग्रेस कार्यकर्त्यांची जवळीक साधून काँग्रेस पक्षाचे कार्य पुढे नेले. मात्र हल्लीच काँग्रेसचे गोवा मुख्य प्रभारी पी. चिदंबरम यांनी गटाध्यक्षांना पक्षाचे तिकीट देता येणार नाहीत असे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवार उलारिको यांनी काँग्रेस गटाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान उलारिको यांच्याशी संपर्क साधला असता काँग्रेसच्या काही सदस्यांचा प्रसिद्धी घेण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट केले.आपण काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com